घरदेश-विदेशपत्रकार आणि माजी नौदल कमांडरला अटक; हेरगिरी प्रकरणी CBI ची कारवाई

पत्रकार आणि माजी नौदल कमांडरला अटक; हेरगिरी प्रकरणी CBI ची कारवाई

Subscribe

CBIने डिफेन्स पत्रकार विवेक रघुवंशी आणि नौदलाचे माजी कमांडर आशिष पाठक यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. एजन्सीने दोघांनाही मंगळवारी रात्री अटक करून बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही ६ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

CBIने डिफेन्स पत्रकार विवेक रघुवंशी आणि नौदलाचे माजी कमांडर आशिष पाठक यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. एजन्सीने दोघांनाही मंगळवारी रात्री अटक करून बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही ६ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. ( The CBI has arrested defense journalist Vivek Raghuvanshi and former Navy Commander Ashish Pathak on espionage charges )

विवेक आणि आशिष यांच्यावर आरोप आहे की त्यांनी डीआरडीओ प्रकल्प आणि संरक्षण करारांशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा केली आणि ती परदेशी गुप्तचर संस्थांना पाठवली. विवेक रघुवंशी हे डिफेन्स न्यूज या अमेरिकन डिफेन्स न्यूज वेबसाइटसाठी लिहितात. विवेक यांनी LinkedIn वर लिहिले आहे की त्याला रिपोर्टिंगचा 32 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.

- Advertisement -

ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

सीबीआयने मंगळवारी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि जयपूरमधील 15 ठिकाणी छापे टाकले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी पत्रकार रघुवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून दिल्ली पोलिस याप्रकरणी माहिती गोळा करत होते.

डिसेंबरमध्ये तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. एजन्सीने त्यांच्याविरुद्ध कलम 3 (हेरगिरी) आणि कलम 120-बी (गुन्हेगारी कट) ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितल्यानुसार, आरोपी देशाच्या धोरणात्मक तयारीशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करत होते. ते भारताच्या मैत्रीपूर्ण देशांसोबतच्या राजनैतिक चर्चेची माहितीही गोळा करत होते. यानंतर ती सर्व माहिती इतर देशांच्या गुप्तचर यंत्रणांना पाठवत असत. ही माहिती लीक झाल्यास भारताचे या देशांसोबतचे संबंध बिघडण्याचा धोका असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

( हेही वाचा: मोठी बातमी! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदामंत्री पदावरून हटवलं )

सीबीआयकडून 48 इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

तपासादरम्यान आरोपींकडून संवेदनशील माहिती असलेली अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सीबीआयने लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाइल फोन, हार्ड डिस्क आणि पेन ड्राइव्हसह 48 इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त केली आहेत. या उपकरणाच्या तपासणीत अनेक ठिकाणांहून माहिती गोळा केली जात असल्याचे समोर आले. आरोपींचे अनेक विदेशी दलालांशी संबंध होते. आरोपींनी त्यांच्याशी करारही केले होते. परदेशातून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -