घरक्रीडाIPL 2023 : प्लेऑफमध्ये कोण मारणार बाजी? चेन्नई-गुजरातमध्ये खेळला जाणार पहिला क्वालिफायर...

IPL 2023 : प्लेऑफमध्ये कोण मारणार बाजी? चेन्नई-गुजरातमध्ये खेळला जाणार पहिला क्वालिफायर सामना

Subscribe

IPL 2023 मधील क्वालिफायरसाठी पहिला सामना आज (ता. 23 मे) चेन्नई आणि गुजरात संघामध्ये होणार आहे. तर आजच्या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत पोहोचणार असून पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.

आयपीएलमध्ये यंदाचे सर्वच सामने फारच रोमांचक झाले आहेत. प्लेऑफसाठी सर्वच संघांनी जोरदार लढत दिली. पण अखेरीस चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई, चेन्नई, गुजरात आणि लखनऊ संघामध्ये अंतिम सामन्यासाठी लढाई होणार आहे. यातील पहिला सामना आज (ता. 23 मे) चेन्नई आणि गुजरात संघामध्ये होणार आहे. तर आजच्या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत पोहोचणार असून पराभूत होणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. (First Qualifier match to be played in Chennai-Gujarat)

हेही वाचा – Neeraj Chopra : कौतुकास्पद! गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा बनला जगातील नंबर वन भालाफेकपटू

- Advertisement -

यंदाच्या वर्षी मुंबई संघ हा प्लेऑफमध्ये तरी पोहोचतो की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण रविवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने पराभूत केल्याने मुंबईच्या संघाने प्लेऑफमधील स्वतःचे स्थान निश्चित केले. तर गुजरात संघ हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. तर त्यापाठोपाठ महेंद्रसिंह धोनी याच्या चेन्नई संघाने चेन्नईने 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता आणि नंतर के. एल. राहुलच्या लखनऊ संघानेही 17 गुणांसह प्लेऑफमध्ये मजल मारत स्थान निश्चित केलेले असले तरी रनरेटच्याबाबतीत ते चेन्नईपेक्षा मागे आहेत.

प्लेऑफमध्ये हे संघ येणार आमने-सामने
आयपीएल 2023 (IPL 2023)च्या प्लेऑफमध्ये आज (ता. 23 मे) पहिला क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. पहिला क्वालिफायरसाठी गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात लढत होणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार असून या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत स्थान मिळवेल. तर, पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायरनंतर उद्या बुधवारी (ता. 24 मे) एलिमिनेटर सामना खेळला जाईल. एलिमिनेटर सामना लखनौ आणि मुंबई संघात होणार आहे. तर या सामन्यातील विजयी संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघाशी खेळणार आहे. तसेच एलिमिनेटरमध्ये जो संघ पराभूत होईल, त्याचा आयपीएल 2023 मधील प्रवास तिथेच थांबणार आहे. म्हणजेच तो यंदाच्या वर्षी पराभूत होणारा संघ चौथ्या स्थानावर असेल. अशा स्थितीत 26 मे रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा निर्णय होईल. यानंतर 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवला जाईल.

- Advertisement -

गुजरात टायटन्सच्या संघाने सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी या संघाने आयपीएल 2022 चे विजेतेपद हे स्वतःच्या नावे केले होते. तर चेन्नईने 12 व्यांदा प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. लखनऊ सुपर जायंट्स हा संघ सुद्धा सलग दुसऱ्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची मुंबई इंडियन्स संघाची ही नववी वेळ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -