घरमहाराष्ट्र२०१८ अपघाताचे वर्ष; ९ हजार ५०० लोकांचा अपघाती मृत्यू

२०१८ अपघाताचे वर्ष; ९ हजार ५०० लोकांचा अपघाती मृत्यू

Subscribe

राज्यात २०१८ मध्ये अपघातामध्ये ८.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१७ या ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ८८७ अपघाती मृत्यू झाले.

अपघातांमुळे जीव गमवावा लागणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रस्ते अपघातांमुळे राज्यात २०१८ साली ९,५०० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, ठाणे जिल्ह्यात २२९ जणांना रस्ते अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्यानं मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना दुचाकीवर असल्यास हेल्मेट सक्ती केली आहे. केंद्राच्या रस्ता सुरक्षा सप्ताहासोबतच राज्यात पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयांमार्फत रस्ता सुरक्षा पंधरवडा, रस्ता सुरक्षा सप्ताह साजरे केले जातात. त्यानंतर देखील दुर्दैवाने रस्ते अपघातांची संख्या कमी झालेली नाही. राज्य शासनाच्या परिवहन विभागातर्फे वारंवार रस्ते अपघात कमी व्हावेत यासाठी कार्यक्रम देखील राबवले जातात. शिवाय, त्यासंदर्भातील सुचना आणि निर्देश देखील दिले जातात. पण, नियमांना हरताळ फासणार्‍यांची संख्या देखील लक्षणीय आहे.

महाराष्ट्रात २०१३ ते २०१७ या कालावधीत अपघाती मृत्यूत घट दिसते. मात्र २०१८ मध्ये अपघातामध्ये ८.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१७ या ९ महिन्यांच्या कालावधीत ६ हजार ८८७ अपघाती मृत्यू झाले. तर, १५ हजार ५८ जण जखमी झाले आहेत. जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ९ हजार ६८३ मृत्यू झाले. तर, जखमींची संख्या १५ हजार २०७ आहे. ठाणे जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये १७ जणांचा अपघाती मृत्यू झाला. विविध अपघातांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांची संख्या ५२ आहे. अपघातामध्ये किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या ही ३६ आहे. तर, नोव्हेंबर २०१८ मध्ये १४ जणांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांची संख्या ५९, तर, ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. केवळ जानेवारी २०१७ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत २०१ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर, ५०५ गंभीर आणि ३८६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २२९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. तर, ५६२ जण गंभीर जखमी आणि ३३४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. २०१७च्या तुलनेत मरण पावलेल्यांची संख्या आणि जखमींची संख्या वाढलेली दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -