घरदेश-विदेशकुत्र्याच्या पिल्लांची क्रूरतेने हत्या करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक

कुत्र्याच्या पिल्लांची क्रूरतेने हत्या करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना अटक

Subscribe

कोलकाता येथील महाविद्यालया बाहेर काही दिवसांपूर्वी कुत्र्याची १७ पिल्ले मृतावस्थेत सापडली होती. या पिल्लांची क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

कोलकाता येथील वैद्यकिय महाविद्यालयाच्या आवारात तीन बॅगेत कुत्र्याच्या पिल्लांचे मृतदेह सापडले होते. बॅगांमधून १५ ते १७ पिल्ले हस्तगत करण्यात आली होती. या प्रकरणी कोलकाता येथील नील रतन सिगार रुग्णालयाच्या महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकिय महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी पिल्लांना अगोदर छळले होते. यानंतर पिल्लांची क्रूरतेने हत्या करण्यात आली. पिल्लांच्या मृतदेहांची विल्लेवाट लावण्यासाठी त्यांनी प्लास्टिकच्या बॅगचा वापर केला. हे मृतदेह महाविद्यालयाच्या आवारातच फेकून देण्यात आले होते. या परिसरातील रहिवासी आणि प्राणीप्रेमांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता. यानंतर पोलिसांनी तपास करुन या आरोपींना अटक केली आहे.

विद्यार्थ्यांनी केली हत्या

महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला मुत्सुसी मंडल आणि  तिसऱ्या वर्षात शिकत असलेला सोमा बर्मन असे या आरोपींचे नाव आहे. या दोघांना आपला गुन्हा कबुल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन आरोपींना भारतीय दंड संहिता आणि पशुधन क्रूरता कायदा प्रतिबंधक कलम ११ एल (कलम ४२ ९) आणि २०१ (पुरावा लपवून ठेवण्याचे पुरावे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींना सियालदाह कोर्टात सादर केले जाईल.

- Advertisement -

बंगाली चित्रपट सृष्टीनेही केला निषेध

प्राण्यांवर केलेल्या अत्याचाराचा प्राणी संघटनांनी विरोध केला आहे. याचबरोबर बंगाली चित्रपट इंडस्ट्रीकडूनही या घटनेचा निषेध केला जात आहे. “अशा प्रकारच्या घटनांमुळे माणूसकी संपल्याचे दिसून येते.” अशी प्रतिक्रिया बंगाली अभिनेत्री मीमी चक्रबर्तीने दिली आहे. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -