घरमुंबईबुलेट ट्रेनला एकही इंच जागा देणार नाही

बुलेट ट्रेनला एकही इंच जागा देणार नाही

Subscribe

पालघरकरांनी जपानी कंपनीला ठणकावले

बुलेट ट्रेनसाठी एकही इंच जागा न देण्याचे पालघरकरांनी या प्रकल्पाला 88 हजार कोटी रुपयांचे कर्ज देणार्‍या जपानी कंपनीला ठणकावून सांगितले आहे.या प्रकल्पाला कर्ज देणार्‍या जीका या जपानी कंपनीचे प्रतिनिधी बुधवारी दुपारी पालघरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी बुलेट ट्रेनला विरोध करणार्‍या हनुमान नगर, मान आणि नागझरी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. त्यावेळी आम्ही आमची एक इंचही जमीन देणार नाही, बुलेट ट्रेनचा आम्हाला काहीही फायदा नाही, आमचे आयुष्य या प्रकल्पामुळे उद्ध्वस्त तर होईलच पण त्याचबरोबर पालघर जिल्ह्याच्या पर्यावरणाचाही र्‍हास होईल. फक्त एका माणसासाठी आम्हाला उद्ध्वस्त करू नका, असे यावेळी येथील आदिवासी बांधवांनी त्यांना सांगितले.

यावेळी बुलेट ट्रेनविरोधातील ग्रामपंचायतींचे ठरावही या प्रतिनिधींना देण्यात आले. तसेच, भूमिपुत्र बचाव आंदोलनतर्फे एक निवेदनही त्यांना देण्यात आले. भूमिसेनेचे संस्थापक काळुराम धोदडे, पर्यावरण समितीचे समन्वयक समीर वर्तक, मॅकेन्झी डाबरे,आदिवासी एकता परिषदेचे राजू पांढरा, दत्ता सांबरे,शेतकरी संघर्ष समितीचे संतोष पावडे यांच्यासह गावांचे सरपंचही यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -