घरमहाराष्ट्रध्वजारोहणासाठी कॉलेजला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

ध्वजारोहणासाठी कॉलेजला जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

Subscribe

अपघातामध्ये गोविंद दहिफळे आणि पुजा भोसले या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही महात्मा गांधी कॉलेजमध्ये शिकत होते.

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी कॉलेजमध्ये जाणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. लातूरच्या अहमदपूरजवळील काजळी हिप्परगा येथे ही घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी कॉलेजमध्ये दुचाकीवरुन जात असताना या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोघेही एनसीसी परेडसाठी कॉलेजमध्ये जात होते.

दोघेही बीएचे विद्यार्थी 

आज सकाळी साडेसहा वाजता हिप्परगा येथे ही घटना घडली. अपघातामध्ये गोविंद दहिफळे आणि पुजा भोसले या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दोघेही महात्मा गांधी कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही राहत असलेली गावं शेजारी-शेजारी असल्यामुळे ते एकत्र कॉलेजला जात होते. गोविंद बीएच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत होता तर पुजा बीएच्या द्वितीय वर्षामध्ये शिकत होती.

- Advertisement -

पोलिसांचा तपास सुरु

गोविंद आणि पुजा दुचाकीवरुन कॉलेजला जात होते. त्यांच्या गाडीला मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. याघटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. या अपघाचा तपास पोलिसांकडून सरु आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे या समारंभाला गालबोट लागले. तर या घटनेमुळे पुजा आणि गोविंद राहत असलेल्या गावात शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -