घरमहाराष्ट्रनाशिकधुळ्यानजीक नामांकित मद्याची हेराफेरी करणारे दोघे जेरबंद; लाखोंचे मद्य जप्त

धुळ्यानजीक नामांकित मद्याची हेराफेरी करणारे दोघे जेरबंद; लाखोंचे मद्य जप्त

Subscribe

बकार्डी कंपनीमधून भरलेल्या मद्याची परस्पर विल्हेवाट लावत असताना दोघाना मोहाडी पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. त्यांंच्या ताब्यामधून लाखोंचे मदय जप्त करण्यात आले आहे.

बकार्डी कंपनीमधून भरलेल्या मद्याची परस्पर विल्हेवाट लावत असताना दोघाना मोहाडी पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले. त्यांंच्या ताब्यामधून लाखोंचे मदय जप्त करण्यात आले आहे. महामार्गावर अशा पध्दतीने हेराफेरी झाल्याचे आणखी गुन्हे उजेडात येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी व्यक्त केली आहे.

मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांना माहिती मिळाली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे व निरीक्षक अभिषेक पाटील यांनी दोन बनावट ग्राहक तयार करून पाठविले. या दोघा ग्राहकांनी सौदा केला. या दोघांनीकंटेनरमधून मद्याचे बॉक्स काढण्यास सुरूवात करताच पोलीस पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांकडून बकार्डी कंपनीच्या ७५० मिलीच्या १२०० बाटल्या, तसेच १७ लाख ९२ हजार रुपये किंमतीचे १८० मिलीच्या ११ हजार ९५२ बाटल्या असा २३ लाख ९२ हजार ८०० रुपये किंमतीचा मदयसाठा आणि १० लाखांचा कंटेनर जप्त केला. चौकशीअंती दिनेशकुमार लखनप्रसाद यादव व राजकुमार शंकर सैनी हे बकार्डी कंपनीचे मालवाहक असल्याचे पुढे आले आहे. हे दोघे कंपनीच्या नागपूर येथील डिस्टिलरीमधुन माल ट्रकमध्ये भरुन ठाणे शहराकडे घेऊन निघाले होते. वाटेतच या मदयाची विक्री करून पैसे घेऊन दोघे बिहार राज्यात पलायन करण्याच्या तयारीत होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -