घरदेश-विदेशInterim Budget 2019 : आज अर्थसंकल्प सादर होणार; करसंबंधी 'हे' बदल अपेक्षित

Interim Budget 2019 : आज अर्थसंकल्प सादर होणार; करसंबंधी ‘हे’ बदल अपेक्षित

Subscribe

आज संसदेत मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात कर संबंधीत काय बदल होतील? याविषयी सगळीकडे चर्चा सुरु आहे.

आज मोदी सरकारच्या अखेरच्या काळातील शेवटचा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प केंद्रिय प्रभारी अर्थमंत्री पीयूष गोयल मांडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. या अर्थसंकल्पामध्ये वैयक्तिक करदात्यांना काही कर सवलती मिळण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात वैयक्तिक कर सवलती दिल्यास वैयक्तिक बचत, निवृत्ती लाभ, वित्तीय नियोजन आणि क्रयशक्ती यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र सिंग तोमर म्हणाले की, ”सबका साथ सबका विकास’ या आमच्या सरकारच्या मंत्राचं अर्थसंकल्पात प्रतिबिंब दिसेल’.

करसंबीधी लक्षणीय बदल होऊ शकतात

आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सर्वाचे डोळे लागलेले नाहीत. कर कमी होईल, अशी आशा बाळगली जात आहे. २८ फेब्रुवारीला डायरेक्ट टॅक्स कोड रिपोर्ट जाहीर होणार आहे. या अनुषंगाने अर्थसंकल्पामध्ये कर संबंधात लक्षणीय बदल केले जाण्याची शक्यता कमी असल्याचे अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, नवीन आर्थिक वर्षापासून कोणत्या दराने करवसुली करायची, याची माहिती अर्थसंकल्पात देणे आवश्यक असल्याने नवे प्राप्तिकर जाहीर केले जाणार आहे.

- Advertisement -

प्राप्तीकरणासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ होण्याची शक्यता

या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरणासाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ होण्याची शक्यता आहे. ६० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींसाठी सध्या अडीच लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असून ही मर्यादा लाखांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर ६० ते ८० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना सध्या तीन लाखाच्या उत्पन करमुक्तची मर्यादा साडे तीन लाखांपर्यंत जावू शकते. त्याचबरोबर महिलांचे करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांएवढी वाढवण्याची अपेक्षा आहे.


हेही वाचा – मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सर्वांना खुश करणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -