घरट्रेंडिंगWorld Cancer Day: तुम्ही कॅन्सरला हरवू शकता

World Cancer Day: तुम्ही कॅन्सरला हरवू शकता

Subscribe

पी.डी.हिंदुजा ते जहांगीर कला दालना पर्यंत १०० बाइकस्वारांनी कर्करोगातुन बाहेर निघालेल्या रूग्णांनासोबत घेऊन एक अनोखा रॅलीचे आयोजन केल.

कर्करोगाच्या नावानेच आपल्या हृदयाचा ठोका चुकतो. आज ४ फेब्रुवारी जागतीक कर्करोग दिन. दरवर्षी दिर्घकाळ चालणाऱ्या कर्करोग या आजारामुळे अनेक लोकांचे मृत्यू होतात. भारतामध्ये कर्करोग असणाऱ्या रूग्णांची संख्या दरवर्षी वाढत असल्याच दिसत आहे. भारतातील आरोग्य संघटनेच्या कर्करोगा संदर्भातील अहवालानुसार, २०१८ मध्ये ७,८४,८२१ जणांचा कर्करोगमुळे मृत्यू झाले अशी नोंद केली आहे. भारतामध्ये दरवर्षी नवीन रूग्णाची संख्या ही वाढत असल्याच दिसून येत आहे.

कर्करोग रूग्णामध्ये वाढ झाली असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे आज हि जागतीक कर्करोग दिना निमित्त पी.डी.हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसीने राइडफॉरकॉज यांनी कर्करोगाबद्दल जन जागरूती करण्यासाठी एक वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘कॉन्सर इज क्युरेबल राइड’ यांच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली. या वर्षी युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने #IAmAndlWill असा विषय दिला होता. त्यानुसार १०० बाइकस्वारांनी कॅन्सरमधून बाहेर आलेल्या रूग्णांना मागच्या सीटवर बसवून एक रॅली काढली. कॅन्सरनंतरही आयुष्य आहे, असा सकारात्मक संदेश या बाइकस्वारांनी दिला आहे. पी.डी.हिंदुजा हॉस्पिटल पासून ते जहांगीर कला दालना पर्यंत रॅली काढण्यात आली. या उपक्रमात कॅन्सरमधून बाहेर आलेले विविध क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते. पद्मश्री शिवमणी यांच्या सांगीतिक कार्यक्रमाने या उपक्रमाची सांगता झाली.

- Advertisement -

पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल विषयी

पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर आज देशातील अग्रगण्य मल्टि-स्पेशालिटी टेरिटरी केअर रुग्णालयांपैकी एक समजले जाते. दर्जेदार सेवेवर रुग्णालय भर देत असून, एनएबीएच, सीएपी आणि आयएसओचे मानांकन व प्रमाणपत्र लाभलेल्या हे रुग्णालय आहे. आघाडीच्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत हे रुग्णालय कायम भागीदारी करत आले आहे. अमेरिकेतील डिव्हिजन ऑफ एड्स (एनआयएआयडी आणि एनआयएच) या संस्थेसोबत रुग्णालयाने भारतात प्रादुर्भावातून होणाऱ्या आजारांवर संशोधन करणारे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी करार केला आहे. ‘वर्क टू गिव्ह’ या आपल्या मार्गदर्शक तत्त्वाशी सुसंगती राखत, रुग्णालय ‘सर्व्ह विथ पॅशन’ हा ग्रामीण आरोग्य कार्यक्रम राबवते. या कार्यक्रमांर्तगत आदिवासी भागांत मोफत आरोग्यसेवा पुरवली जाते.

“कॅन्सर बरा होऊ शकतो हा संदेश आम्हाला या जागतिक कॅन्सर दिनी दमदारपणे द्यायचा आहे आणि आम्ही मुंबईभर बाइक राइड काढून कॅन्सरमधून बाहेर आलेल्यांनाच यासाठी पाऊल उचलायला लावत आहोत. भारतातील कॅन्सरचे चिंताजनक प्रमाण बघता, या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे अपरिहार्य आहे. कॅन्सर हा तुमच्या आयुष्याचा शेवट नाही, तुम्ही त्याच्यासोबत लढू शकता आणि विजयी होऊन त्यातून बाहेर पडू शकता हे आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून पोहोचवायचे आहे.”

श्री. जॉय चक्रवर्ती, सी.ओ.ओ, पी.डी.हिंदुजा हॉस्पिटल

“कॅन्सरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच, दुसरीकडे आम्हाला याबद्दल जागरूकता व समाजातील स्वीकृती वाढल्याचेही दिसत आहे. कॅन्सरकडे आता सामाजिक कलंक म्हणून बघितले जात नाही. कॅन्सरनंतरही आयुष्य आहे आणि लवकर निदान व उपचारांच्या मदतीने कॅन्सर बरा होऊ शकतो हा सकारात्मक संदेश सर्वत्र पोहोचवणे महत्त्वाचे आहे.”कॅन्सर हा हळुहळू साथीच्या रोगांसारखा होत चालला आहे आणि त्याचा प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लवकर निदान होणे. प्रत्येकाने लक्षणांकडे लक्ष देणे आणि नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. स्त्रियांनी, विशेषत: ४० वर्षांहून अधिक वयाच्या स्त्रियांनी लवकर निदान व्हावे यासाठी नियमित तपासण्या करून घ्याव्या. कॅन्सरचा प्रतिबंध करण्याचा भाग म्हणून तंबाखू व मद्य टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आरोग्यविषयक निर्णय ठरतात. आरोग्यपूर्ण आहार घेणे व नियमित व्यायाम करणे हे जीवनशैलीतील बदलही कॅन्सरच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पायऱ्या आहेत.

डॉ. आशा कपाडि, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अॅण्ड एमआरसीच्या मेडिसिन आणि आँकोलॉजी विभागाच्या प्रमुख

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -