घरमनोरंजनमै हुं गुजराती

मै हुं गुजराती

Subscribe

मालिकांची निर्मिती करायची म्हणजे प्रथम प्रेक्षकांचा विचार केला जातो. आज चाळीतल्या, सोसायटीतल्या कथा मालिकेत आणल्या तर त्याला बर्‍यापैकी प्रतिसाद लाभतो. ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘नुक्कड’ यासारख्या कितीतरी मालिका त्यावेळी गाजल्या होत्या. कारण जेवढ्या व्यक्ती तेवढे त्यांचे नमुनेदार किस्से इथे पहायला मिळतात. बर्‍याचशा मालिकेत असे वातावरण वाहिन्यावाल्यांनी आणलेले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘चंद्रकांत चिपळूणकर सिडी बमवाला’ अशी काहीशी नावे सांगता येतील. मालिकेइतकीच यातील पात्रे ही प्रेक्षकप्रिय ठरलेली आहेत. हा मान आता ‘बाकरवडी’ या मालिकेतल्या महेंद्र ठक्कर या पात्राला मिळत आहे. ही व्यक्तीरेखा परेश गणात्रा हा सादर करत आहे.

‘बाकरवडी’ ही मालिका सोनी सब वाहिनीवर दाखवली जाते. गुजराती आणि मराठी अशा दोन कुटुंबात रंगणारी ही मालिका आहे. त्यांचे रहाणीमान, भाषा, सण-उत्सव या सार्‍या गोष्टी या दोन कुटुंबांच्या निमित्ताने दाखवताना विनोदाची आतषबाजी यातून केली जाते. महेंद्र साकार करणार्‍या परेशने यापूर्वी अनेक मालिकांमध्ये गुजराती व्यक्तीरेखा साकार केल्यामुळे त्यातला सराईतपणा त्याला महेंद्रच्या भूमिकेसाठी या मालिकेतही उपयुक्त ठरलेला आहे. मै हुं गुजराती बोलावे इतक्या व्यक्तीरेखा त्याने साकार केलेल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -