घरमहाराष्ट्रनाशिकचौथ्या मजल्यावरील लॉफ्टवर अडकलेल्या मांजरीची जीव धोक्यात घालून केली सुटका

चौथ्या मजल्यावरील लॉफ्टवर अडकलेल्या मांजरीची जीव धोक्यात घालून केली सुटका

Subscribe

नाशिकमधील इंदिरानगर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मंगळवारी  (५ फेब्रुवारी) दुपारपासून अडकून पडलेल्या मांजरीची एकाने जीव धोक्यात घालून सुटका केली.

नाशिकमधील इंदिरानगर पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मंगळवारी  (५ फेब्रुवारी) दुपारपासून अडकून पडलेल्या मांजरीची एकाने जीव धोक्यात घालून सुटका केली. मांजर खिडकीच्या लॉफ्टवर अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत बसून असल्याने, तिला वाचवायला जाणाऱ्या व्यक्तीलाच घाबरून थेट खाली उडी मारण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राणीमित्रांनी अत्यंत शांतपणे ही मोहीम फत्ते केली.

मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मंगलरुप गोशाळेच्या टीमसह प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या ही मोहीम हाती घेतली होती. चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर वरच्या बाजूने असलेल्या लॉफ्टवर ही मांजर दुपारपासून अडकली असल्याचे समोरच्या बाजूला असलेल्या काही व्यक्तींच्या लक्षात आल्यानंतर प्राणीप्रेमींना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही संयुक्त मोहीम हाती घेतली गेली. ज्या इमारतीवर ही मांजर अडकून होती, तेथील टेरेसवर जाऊन एका व्यक्तीच्या कमरेला दोर बांधून त्याला खाली लॉफ्टवर उतरवण्यात आले. त्याने कापडाच्या सहाय्याने अलगद मांजरीला उचलून टेरेसवर उभ्या व्यक्तींकडे दिले. मांजर अत्यंत भेदरलेली आणि उपाशी असल्याने, प्राणीमित्रांनी प्रथम तिच्यासाठी दुधाची व्यवस्था केली होती. मांजरीला बाहेर काढण्याची ही मोहीम फत्ते झाल्यानंतर सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -