घरदेश-विदेशराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांना उद्या पुरस्कार

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांना उद्या पुरस्कार

Subscribe

राष्ट्रपती भवनात होणा-या एका शानदार कार्यक्रमात अभिराम भडकमकर, प्रकाश खांडगे यांच्यासह महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बुधवारी राष्ट्रपती भवनात होणा-या एका शानदार कार्यक्रमात प्रसिध्द नाटय लेखक अभिराम भडकमकर,नाटय दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 6 फेब्रुवारी 2019 रोजी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात येणार आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील ४ कलाकारांसह देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाटय अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत

कोणाला दिला जातो पुरस्कार

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केल जात.

- Advertisement -

पुरस्कार विजेते ‘भडकमकर’ यांचा प्रवास

नाटय क्षेत्रातील विषेश योगदानासाठी नाट्यलेखक म्हणुन प्रसिध्द असलेले अभिराम भडकमकर यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. श्री भडकमकर यांनी गेली दोन दशकं नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे. नाटक, सिनेमा, कथा कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे श्री. भडकमकर उत्तम कलावंतही आहेत. ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि आजच्या मालिका विश्वाच्या पडदयामागच्या वास्तवाच दर्शन घडवणारी ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्टयपूर्ण ठरली. दिल्लीतील राष्ट्रीय नाटय्‍ विद्यालयात कलेचे धडे गिरवणारे श्री.भडकमकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहीली आहे. ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शीत केला आहे. विविध नाटकही त्यांनी लिहीली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -