घरदेश-विदेशआर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करा, सुसाईड नोटमध्ये भय्यू महाराजांनी केला उल्लेख

आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करा, सुसाईड नोटमध्ये भय्यू महाराजांनी केला उल्लेख

Subscribe

तणावाखाली येऊन आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली.त्यानंतर भय्यू महाराजांची आणखी एक सुसाईड नोट समोर आली आहे. यामध्ये सर्व आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करण्याची इच्छा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली आहे. विनायक हा भय्यू महाराजांचा जवळचा सेवक होता. कुटुंबियांना डावलून भय्यू महाराजांनी सेवकाकडे आर्थिक व्यवहार देण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

तणावाखाली येऊन आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली.त्यानंतर भय्यू महाराजांची आणखी एक सुसाईड नोट समोर आली आहे. यामध्ये सर्व आर्थिक व्यवहार सेवकाच्या नावे करण्याची इच्छा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली आहे. विनायक हा भय्यू महाराजांचा जवळचा सेवक होता. मागील १५ ते २० वर्षापासून विनायक भय्यू महाराजांच्या सोबत आहे. कुटुंबियांना डावलून भय्यू महाराजांनी सेवकाकडे आर्थिक व्यवहार देण्याची इच्छा व्यक्त केल्याने आता शंका उपस्थित केल्या जात आहेत. कौंटुबिक कलह आणि तणाव यामुळे भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये मी आता खचलो आहे, कुटुंबाची जबाबदारी कुणीतरी स्वीकारा असे भय्यू महाराज यांनी लिहून ठेवले आहे.

भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर सर्वच क्षेत्रातून हळहळ

भय्यू महाराजांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर हळहळ व्यक्त केली गेली. भय्यू महाराज यांची राजकीय नेत्यांशी देखील जवळीक होती. राजकीय नेते भय्यू महाराज यांचा सल्ला देखील घेत. शिवाय राजकीय पेच सोडवण्यासाठी देखील अनेक वेळा भय्यू महाराजांचा पुढाकार असे.

- Advertisement -

इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

भय्यू महाराज यांच्यावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दुपारी २.३० वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे भय्यू महाराजांवर अंत्यसंस्कार केले जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -