घरमहाराष्ट्रनाशिकगुंडांच्या घरी हात साफ; १२ मिनिटांत चोरी फसली

गुंडांच्या घरी हात साफ; १२ मिनिटांत चोरी फसली

Subscribe

नाशिकरोड येथील तीन वेगवेगळ्या घटनांत चोरट्यांनी सोने व रोकड असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. त्यातील एका हॉटेलातील चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला तर गुंड यांच्या घरातून मात्र रोकड लंपास केली.

नाशिकरोड भागातील पळसे येथील फुलेनगरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरफोड्या करत सोने व रोकड असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. पोलीस अधिकारी व श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

पळसे येथील फुलेनगर भागातील रहिवाशी रामदास भिकाजी पाटील (गुंड) यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून घरातील २० हजारांची रक्कम पळवली. तसेच, याच भागातील ‘हॉटेल १२ मिनिट’मध्येही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी देवी मंदिर भागातील रोहीणी संदीप म्हस्के यांच्या घराचा दरवाजा तोडून एक लाख पाच हजार किंमतीची सोन्याची पोत व ४५ हजार किंमतीचा हार असा दीड लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही चोरी केल्यानंतर बाजूच्याच संदीप सुधाकर गायधनी यांची मोटारसायकल (एमएच-१५, ईआर-१२६९) त्यांनी चोरुन नेली. एकाच ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सुनील शेंडकर करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -