घरदेश-विदेशपंजाबमधील पत्रकारांना मिळणार १२ हजार रुपये पेन्शन

पंजाबमधील पत्रकारांना मिळणार १२ हजार रुपये पेन्शन

Subscribe

गेल्या अनेक वर्षापासून पंजाबमधील पत्रकारांकडून पेन्शनची मागणी केली जात होती. अखेर या प्रलंबित मागणीला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे.

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकारांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पंजाबमधील मान्यता प्राप्त ज्येष्ठ पत्रकारांना १२ हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी ज्येष्ठ पत्रकारांना १२ हजार रुपये मासिक पेन्शन देण्यास मंजूरी दिली. गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांकडून ही मागणी सुरु होती. अखेर या प्रलंबित मागणीला मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेला पात्र होण्यासाठी पत्रकाराचे वय ६० वर्ष असणे गरजेचे आहे. ज्यांनी पंजाबमध्ये काम केलेले आहे. तसंच ज्यांच्याकडे गेल्या ६ वर्षापैकी ५ वर्ष अधिस्वीकृती पत्रिका आहे अशा पत्रकारांना बारा हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

पंजाबमधील ज्येष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत होती. पंजाब सरकारने पत्रकारांना पेन्शन योजना लागू करु असे आश्वासन दिले होते. त्यानंतर अवघ्या काही महिन्यास सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करत ज्येष्ठ पत्रकारांना दिलासा मिळाला आहे. आता पंजाब सरकारच्या पाठोपाठ महाराष्ट्र सरकार पत्रकारांना कधी पेन्शन देणार असा सवाल महाराष्ट्रातील पत्रकार करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -