घरमुंबईराफेलची फाईल हरवली आहे कुठे मिळते का बघा?; ठाण्यात बॅनरबाजी

राफेलची फाईल हरवली आहे कुठे मिळते का बघा?; ठाण्यात बॅनरबाजी

Subscribe

ठाण्यातील नितीन कंपनीजवळील उड्डाण पुलावर आज, रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडून एक बॅनर लावण्यात आला आहे.

ठाण्यातील नितीन कंपनीजवळील उड्डाण पुलावर आज, रविवारी सकाळी काही अज्ञात व्यक्तींकडून एक बॅनर लावण्यात आला. या बॅनरमध्ये काकू, मामा – मामी, दादा, ताई राफेलची फाईल हरवली आहे. कुठे मिळते का बघा? कपाटात शोधा, गादीखाली शोधा. मिळाल्यास चौकीदाराची संर्पक साधा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बॅनरवर कोणत्याही पक्षाचे नाव किंवा चिन्ह नसल्याचे दिसत आहे.

बॅनरने ठाणेकरांचे लक्ष वेधले 

आज सकाळपासून हा बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधत आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टात राफेलप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी राफेल कराराची कागदपत्रे चोरी झाल्याचे सांगितले होते. एकीकडे पंतप्रधान मोदी हे चौकीदार असल्याचे सांगत आहेत. मात्र या चौकीदाराच्या ताब्यातूनच ही कागदपत्रे चोरीला गेल्यामुळे नागरिकांमध्ये सांताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचे प्रतिबिंब या फ्लेक्समधून पाहावयास मिळाले आहे. राफेल करार संदर्भातील कागदपत्रे गोपनीय होती. परंतू या कागदपत्रांच्या फोटोकॉपीज काढल्यामुळे ती सार्वजनिक झाली.” असे सांगितल्यानंतर देखील विरोधी लोकांकडून सरकारवर टिका करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांसह देशभरातून सर्वांनी सरकारवर टीका करणे सुरु केले आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टासमोर दिली माहिती 

राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती सरकारच्या वतीने महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान दिली होती. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली. दरम्यान, संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणारे दोन इंग्रजी वृत्तपत्र आणि याच आधारे याचिका दाखल करणाऱ्या वकिलांविरोधात ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती देखील केंद्र सरकारच्यावतीने सुप्रीम कोर्टात देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -