घरदेश-विदेशनेदरलँड्सच्या युट्रेच शहरात गोळीबार; एक ठार, अनेक नागरिक जखमी

नेदरलँड्सच्या युट्रेच शहरात गोळीबार; एक ठार, अनेक नागरिक जखमी

Subscribe

गेल्या आठवड्यात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज, सोमवारी नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या आठवड्यात न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच आज, सोमवारी नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरातील ट्राममध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची प्रार्थमिक माहिती समोर येत असून अनेक जण यात जखमी झाले आहे. घटनास्थळी दहशतवादविरोधी पोलीस उपस्थित असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

- Advertisement -

न्यूझीलंडच्या गोळीबाराची घटना ताजी

या गोळीबारात अनेकजण जखमी झाले असून घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले आहे, असे युट्रेक्ट पोलिसांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. मदतीसाठी हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक वेळेनुसार सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. पोलिसांनी परिसराला घेराव घातला असून तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यूझीलंडच्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबारात ५० पेक्षा जास्त निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला होता. हा गोळीबार ऑस्ट्रेलियन दहशतवाद्याने केला होता.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -