घरदेश-विदेशपब्जीचा विळखा; त्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं पब्जी कसा खेळावा?

पब्जीचा विळखा; त्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं पब्जी कसा खेळावा?

Subscribe

एका विद्यार्थ्याने पब्जी गेम कसा खेळावा? हे आपल्या उत्तरपत्रिकेत लिहिले आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक दोन्ही हैराण झाले आहेत.

पब्जी गेमचा शालेय विद्यार्थी आणि तरुणांवर फार मोठा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. आतापर्यंत आपण असे बरेच किस्से पाहिले आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने घरात आई-वडील पब्जी खेळू देत नाहीत म्हणून घर सोडले होते आणि वेटरचे काम सुरु केले होते. पब्जी गेममुळे हत्या देखील झाल्याच्या भयानक घटनादेखील घडल्या आहेत. आतादेखील असाच एक अजब आणि भयनाक प्रकार उघडकीस आला आहे. सतत पब्जी गेम खेळल्यामुले विद्यार्थ्यांने परिक्षेत उत्तर पत्रिकेवर पब्जी गेम कसा खेळावा? याचे विश्लेषण लिहिले आहे. या विश्लेषणामागील कारणही त्याने सांगितले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

कर्नाटकमधील एका विद्यार्थ्याने विद्यापीठाच्या परिक्षेतील उत्तरपत्रिकेत उत्तरांऐवजी पब्जी गेम कसा डाऊनलोड करावा आणि कसा खेळावा यासंबंधी लिहीले आहे. यामुळे तो विद्यार्थी नापास झाला आहे. विद्यार्थ्याचे हे उत्तर पाहिल्यावर उत्तर पत्रिका तपासणाऱ्या शिक्षकाला धक्काच बसला. त्यांनी याबाबत मुख्यध्यापकांजवळ तक्रार केली. त्यामुळे शाळेच्या मुख्यध्यापकांनी तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याला ओरडा देत त्याच्याकडून मोबाईल काढून घेतला आहे. पालकांनी बऱ्याचदा आपल्या मुलाला मोबाईमध्ये वेळ घालवताना पाहिले होते. परंतु, आपल्या मित्राशी चॅट करत असल्याचे तो पालकांना सांगत असे. अखेर या मुलानेही आपली चूक मान्य केली आहे.

- Advertisement -

पब्जीमुळे हुशार विद्यार्थी झाला नापास

पब्जीमुळे हुशार विद्यार्थी नापास झाला आहे. तो प्रत्येक विषयात टॉपर होता. यासंदर्भात तो विद्यार्थी सांगतो की, आपण गेमच्या इतक्या आहारी गेलो होतो की अनेकदा परिक्षा जवळ आली तरी आपल्याला त्याचे भान राहायचे नाही. पब्जी गेममुळे आपले अभ्यासात लक्ष राहत नसे, असी कबुली त्याने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -