घरदेश-विदेशयासिन मलिकच्या 'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' संघटनेवर बंदी; केंद्राचा निर्णय

यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ संघटनेवर बंदी; केंद्राचा निर्णय

Subscribe

जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

जम्मू कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकच्या जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे फुटिरतावाद्यांना जोरदाऱ धक्का बसला आहे. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवर दहशतवादी कारवायांना समर्थन दिल्याचा आरोप आहे. ईडीने मागील काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये ईडीने यासिन मलिकच्या अनेक ठिकाणांवर धाड टाकली होती. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने फुटिरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

- Advertisement -

याआधी २८ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारने जमात ए इस्लामी या संघटनेवर ५ वर्षासाठी बंदी आणली होती. त्याचसोबत गृह मंत्रालयाने या कारवाईनंतर जमात-ए-इस्लामीचा प्रमुख हामिद फैयाज याच्यासह ३५० पेक्षा अधिक सदस्यांना अटक करण्यात आली. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये फुटिरतावादी नेत्यांवर लक्ष्य ठेवलं आहे.

- Advertisement -

यासिन मलिकबाबात थोडक्यात 

१९६३ मध्ये काश्मीरमध्ये यासिन मलिक यांचा जन्म झाला. १९८७ मध्ये भारताच्या ४ जवानांची हत्या केली होती. यामध्ये यासिनला शिक्षाही झाली होती. पाकिस्तान सरकारच्या इशाऱ्यावर यासिन मलिक जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याचं काम करतो. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांशी संपर्कात असतो. १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदू लोकांच्या विरोधात मोठं आंदोलन केलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -