घरदेश-विदेशअंतर्गत वाद मिटवण्यासाठी सेना-भाजप पदाधिकाऱ्यांचे 'वर्षा'वर चहापान

अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सेना-भाजप पदाधिकाऱ्यांचे ‘वर्षा’वर चहापान

Subscribe

भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे काम दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडून सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज वर्षा बंगल्यावर सेना-भाजप पदाधिकाऱ्यांचा चहापानचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती झाली खरी पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काही मनोमिलन होताना दिसत नाही. कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे, यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चक्क मनोमिलन मिलन मेळावे देखील घेतले पण अजूनही अंतर्गत नाराजी सुरू आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोन्ही पक्षाच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचा चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी निवडणुकीची रणनीती आखणे, अंतर्गत वाद मिटवले यावर भर दिला जाणार आहे.

…म्हणून आता चहापानाचा घाट

एकीकडे अर्जुन खोतकर, रावसाहेब दानवे यांच्यामधील वाद दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना मिटवता आला असला तरी किरीट सोमय्या आणि शिवसैनिक यांच्यामधील वाद काही मिटलेला नाही. तसेच इतर भागातही स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस कायम आहे आणि याचा फटका निवडणुकीत बसू नये म्हणून आता वरिष्ठांकडून काळजी घेतली जात आहे. त्यामुळेच आज वर्षावर चहापान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

पदाधिकारी आणि कार्यकर्ते का आहेत नाराज?

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही मित्र पक्ष जरी असले तरी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. शिवसेना ‘सामना’ मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर सडकून टीका करत होते. राम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: आयोध्यात जाऊन आले होते. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजपसोबत युती करणार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनात परस्पराप्रती द्वेष निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर दोन्ही पक्षांकडून युतीची घोषणा झाली. परंतु, यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज झाले आहेत. या नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -