घरमहाराष्ट्र'पराभव दिसत असल्यामुळेच मोदींनी मिसाईलचा शोध जाहीर केला'

‘पराभव दिसत असल्यामुळेच मोदींनी मिसाईलचा शोध जाहीर केला’

Subscribe

डिफेन्स मधल्या गोष्टींची सिक्रसी असायला हवी. मोदींनी वैज्ञानिकांनी केलेलं काम जगासमोर आणले आहे. अँटि मिसाईल टेक्निक जगासमोर आणले. ५-६ वर्षांपूर्वी चीनने सुद्धा असं सॅटेलाईट पाडलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासीयांशी संवाद साधत एलईओ मिसाईलबद्दल सांगितले. हा सगळा मोदींचा नवीन जुमला असून आम्ही त्यांचा निषेध करत असल्याचे भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली त्यामध्ये ते बोलत होते. दरम्यान, ‘डिफेन्स मधल्या गोष्टींची सिक्रसी असायला हवी. मोदींनी वैज्ञानिकांनी केलेलं काम जगासमोर आणले आहे. अँटि मिसाईल टेक्निक जगासमोर आणले. ५-६ वर्षांपूर्वी चीनने सुद्धा असं सॅटेलाईट पाडलं होतं. तेव्हा जगाने ते अॅक्नॉलेज केलं. कोणत्याही पंतप्रधानाने अशा प्रकारे मिसाईल डागल्याचं जाहीर केलेलं नाही. हा सर्व मोदींचा जुमलाचं’ असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसंच, ‘ डिफेन्सचे संशोधन वेळ आल्यावरच वापरलं जातं तेव्हा ते जगासमोर येतं. पण मोदींनी ते जाहीर करून टाकले. हा सरप्राइज एलिमेंट असायला हवा होता. पण भाजपची समोर दिसत असलेली हार विजयामध्ये बदलण्यासाठी मोदींनी ते जाहीर केले’ असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

आचारसंहितेच्या काळात अशाप्रकारची घोषणा करताना कुठलीही परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

‘आम्ही हेलिकॉप्टर वापरू शकत नाही का?’

प्रकाश आंबेडकर लातूरच्या सभेला हेलिकॉप्टरने गेले होते त्यावरुन राजकारणं झाले. त्याचसोबत त्याच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यावर बोलताना त्यांनी असं सांगितले की, ‘अशोक चव्हाण किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुद्र मानसिकता दाखवली आहे. राज्यातल्या सर्व मतदारसंघातून जाण्यासाठी २० दिवसांसाठी आम्ही भाड्याने हेलिकॉप्टर घेतलंय. पुण्यातल्या मांडके अॅण्ड मांडके कंपनीसोबत करार त्याबाबत झाला आहे. भारिपच्या पक्ष निधीतून त्याचा पैसा जाणार आहे. ज्यांना वाटतं आम्हीच फक्त हेलिकॉप्टर वापरू शकतो, बाकीच्यांनी बैलगाड्यातच फिरावं, त्यांनी शुद्र मनोवृत्तीचं दर्शन घडवलं’ असल्याचा आरोप आंबेडकरांनी केली आहे.

- Advertisement -

‘येणारा सर्व निधी बँकेत जातो’

हेलिकॉप्टरच्या संबंधी झालेल्या टीकेवर त्यांनी असे म्हटले आहे की, ‘आम्हाला लोकं निधि देतात, तो आम्ही बँकेत जमा करतो. त्याची सर्व माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. या हेलिकॉप्टरचा रोजचा खर्च ८० हजार असून एकूण १६ लाखांचा करार आहे. लोकांकडून येणारा काही पैसा चेकने आणि काही रोख पध्दतीने येतो तो सर्व पैसा बँकेत जातोट असे आंबेडकरांनी सांगितले.

म्हणून कोळसे पाटलांची भूमिका बदलली…

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी कोळसे पाटील यांच्यावर देखील टिका केली आहे. ‘कोळसे पाटील जेव्हा स्टेजवर होते, तेव्हा त्यांची भूमिका वेगळी होती. ते उमेदवार होते. पण एमआयएम आणि जनता दल एस यांचं जमलं नाही म्हणून आता कोळसे पाटलांची भूमिका बदलली’ असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला आहे.

- Advertisement -

म्हणून भारिपला निवडणुकीत खर्च कमी आहे…

भारिपच्या निवडणुक खर्चावर त्यांच्यावर टीका आणि आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना त्यांनी असे सांगितेल की, ‘ ही लो कॉस्ट इलेक्शनची सुरुवात आहे. यावेळी लोकं पैसे घेतील, पण त्यांना जे करायचंय तेच करतील. आमचे ७० टक्के बूथ बांधून झाले आहेत. जुनी कला पथकांची पद्धत आम्ही तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ‘आमच्याकडे ७ कला पथकं आहेत. त्यांना मानधन द्यावं लागत नाही. त्यांचा प्रवास आणि जेवणाचा खर्च द्यावा लागेल तो पक्षाच्या निधीतून दिला जात असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

सोलापूरच का निवडलं?

पंढरपुरात झालेला धनगर समाजाचा मेळावा आणि धनगर समाजाचा उठाव अपयशी ठरू नये म्हणून सोलापूर निवडलं, असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ‘लातूरचा पर्याय होता. पण तिथे आधीच ठरवलं होतं की, मातंग समाजाचा उमेदवार द्यायचा. माझ्या उमेदवारीमुळे सोलापुरातल्या मुस्लीम मतांना रिलीफ वाटतोय. म्हणून तिथे मतांचं विभाजन होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी वीक झाल्याचं लक्षात आल्यामुळे मुस्लीम मतं आमच्या बाजूने येतील. भोपाळ जेल तोडीमध्ये जी ५ मुस्लीम मुलं एन्काऊंटरमध्ये मारली गेली, ती सगळी सोलापूरची होती. तेव्हा सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. तो राग इथल्या मुस्लीम जनतेमध्ये आहे. त्या प्रकरणात कोणतीही केस किंवा एफआयआर दाखल केली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

जातीच्या उल्लेखावर सारवासारव

‘कुटुंबशाही संपून जात व्यवस्था खिळखिळी होण्यासाठी उमेदवारांच्या जातीचा उल्लेख केला. म्हणजे इतर पक्षातले नेते देखील कुटुंबशाहीला नाकारून पक्षातल्या इतर चांगल्या कार्यकर्त्यांना देखील उमेदवारी देतील’, असे आंबेडकरांनी सांगितले.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -