घरक्रीडापॉवर लिफ्टिंगमध्ये प्रतीक्षा गायकवाडला रजत

पॉवर लिफ्टिंगमध्ये प्रतीक्षा गायकवाडला रजत

Subscribe

हाँगकाँग येथे पार पडलेल्या एशियन वुमन चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत प्रतीक्षा गायकवाड हिने पॉवर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात रजत पदक (सिल्व्हर मेडल) प्राप्त केले आहे. या स्पर्धेत एकूण तीन रजत पदक प्राप्त केल्याने तिचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

तालुक्यातील आसनपोई गावची प्रतीक्षाने हाँगकाँग येथे झालेल्या एशियन वुमन चॅम्पियनशिप 2019 स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेकरिता तिने भारताचे प्रतिनिधित्त्व केले. एशियन पॉवर लिफ्टिंग असोसिअशनकडून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रतीक्षाची निवड झाली होती. ग्रामीण भागातील असतानाही अथक प्रयत्न करून तिने या क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवले आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर देखील प्रतीक्षाने पदके प्राप्त केली आहेत. हाँगकाँग येथे पार पडलेल्या स्पर्धेत प्रतीक्षा हिने बेंच प्रेस 170 किलो वजनी गटात 457.5 ग्रॅम वजन उचलून तब्बल तीन रजत पदक प्राप्त केले.

- Advertisement -

पॉवर लिफ्टिंगमध्ये भारताकडून प्रतिनिधित्त्च करीत प्रतीक्षाने यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशाचे कौतुक सर्व स्तरातून होत असले तरी हाँगकाँगसारख्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा खर्च मोठा होता. सामाजिक स्तरातून किंवा राजकीय व्यक्तींकडून प्रतीक्षाला म्हणावी तितकी आर्थिक मदत झाली नाही. तरी देखील तिची आई सुनीता गायकवाड यांनी न डगमगता मुलीला या स्पर्धेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नाला यश देखील आले आहे. प्रतीक्षाच्या यशाचे कौतुक करण्यासाठी सर्वचजण तिची येथे प्रतीक्षा करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -