घरमनोरंजनसृजनशील कलाकारांचा हुतात्मा

सृजनशील कलाकारांचा हुतात्मा

Subscribe

कलात्मक चित्रपट करायचा म्हटल्यानंतर तद्दन व्यावसायिक असलेल्या कलाकाराला प्राधान्य देता येत नाही. अभिनय, संवाद, मनातल्या भावना एकवटल्या की प्रसंगाला आवश्यक अशी व्यक्तीरेखा साकार होते. अंजली पाटील, वैभव तत्त्ववादी, अभय महाजन, सचिन खेडेकर, आनंद इंगळे, अश्विनी काळसेकर, लोकेश गुप्ते, मोहन आगाशे, रविंद्र मंकणी, छाया कदम आणि विक्रम गोखले अशा कितीतरी कलाकारांनी केवळ या गुणावर आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.

जयप्राद देसाई यांनी आपल्या दिग्दर्शनात हुतात्मा ही वेबसिरिज दिग्दर्शित केलेली आहे. झी-5 वर 1 मे पासून ती दाखवली जाणार आहे. दोन पर्वात ही सिरिज चित्रीत केली जाणार आहे.

- Advertisement -

पहिल्या पर्वात सहा भागांत पहायला मिळेल. 1955 चा काळ या वेबसिरिजसाठी घेतलेला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी या कथेला असल्यामुळे रंगभूषा, वेशभूषा, स्थळ या सार्‍या गोष्टींकडे दिग्दर्शकाने लक्ष केंद्रित केलेले आहे. सृजनशील कलाकारांची कलाकृती म्हणून या हुतात्मा कडे पहावे लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -