घरमहाराष्ट्रजळगावात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू

जळगावात कंटेनर आणि कारचा भीषण अपघात; ३ जणांचा जागीच मृत्यू

Subscribe

अपघातामध्ये कारचा चक्काचुर झाला तर कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. कारमध्ये असलेल्या तिघांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला.

जगळगावमध्ये कंटेनर आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघाताची घटना घडली. चोपडा तालुक्यातील काजीपूरा फाट्यावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहेत.

जळगावच्या काजीपूरा फाट्यावर सकाळी सव्वा आठच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचुर झाला तर कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. कारमध्ये असलेल्या तिघांचा अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात गुलाब कोळी (वय ३६ रा. मांजरोद ता.शिरपूर), अनिल दशरथ जाधव (वय २२ रा. बभलाज ता. शिरपूर) आणि किशोर गजानन बिऱ्हाडे (वय ३५ रा. भटपुरा ता. शिरपूर) हे जागीच ठार झाले तर सचिन पाटील (वय १९ रा. शिरपूर) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -