घरदेश-विदेशश्रीलंकेनंतर ISIS भारतात हल्ला करण्याच्या तयारीत

श्रीलंकेनंतर ISIS भारतात हल्ला करण्याच्या तयारीत

Subscribe

ईस्टर संडेच्या दिवशी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने श्रीलंकेत साकळी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यात मोठी जिवितहानी झाली होती. या हल्ल्यानंतर आयएसआयएस ही संघटना भारतात देखील हल्ला करुन भारतात तिचे पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

गेल्या महिन्यात ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत आयएसआयएसआय या दहशतवादी संघनेने साखळी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्तहानी झाली होती. या हल्यानंतर आयएसआयएस ही संघटना भारतात हल्ला करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर येत आहे. आयएसआयएसचे १५ दहशतवादी समुद्रमार्गे भारताच्या दिशेने निघाले असल्याची माहिती गुप्तहेर खात्याने दिली आहे. हे दहशतवादी नौकेत बसून लक्ष्यद्वीपच्या दिशेला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

किनारपट्टीवर कडक पोलीस बंदोबस्त

गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीनंतर किनारपट्टी भागात कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. ही माहिती श्रीलंकेच्या गुप्तहेर खात्याकडून देण्यात आली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या हालचालींसंदर्भात असे अलर्ट नेहमी येत असतात. मात्र यावेळी दहशतवाद्यांची संख्या देखील सांगण्यात आली आहे. दरम्यान, ही माहिती मिळाल्यांतर २३ मे पासून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -