घरदेश-विदेशयोगी आदित्यनाथांवर टीका करुन अटक झालेला प्रशांत कनौजिया आहे तरी कोण?

योगी आदित्यनाथांवर टीका करुन अटक झालेला प्रशांत कनौजिया आहे तरी कोण?

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणाऱ्या पत्रकार प्रशांत कानौजीला गोरखपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे मोठे वादंग उठले आहे. सोशल मीडियावर काही लोक प्रशांतचे समर्थन करुन योगींवर टीका करत आहेत. तर काही लोक प्रशांतवर टीका करत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्य वक्तव्य केल्याप्रकरणी गोरखपूर पोलिसांनी प्रशांत कानौजी या पत्रकाराला अटक केली आहे. प्रशांत कानौजीने ६ जून रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एक महिला माध्यमांना मुलाखत देत आहे. या मुलाखतीत ती महिला योगी आदित्यनाथ यांची पत्नी असल्याचा दावा करत आहे. या व्हिडिओसोबत प्रशांतने ‘इश्क छुपता नही छुपानेसे योगीजी’ असे लिहले होते. याप्रकरणी गोरखपुर पोलिसांनी शनिवारी ७ जून रोजी प्रशांत कानौजीच्या विरोधात कारवाई करत त्याला अटक केली.

- Advertisement -

कोण आहे प्रशात कानौजी?

प्रशांत कानौजी हा एक मुक्त पत्रकार आहे. त्याने ‘द वायर हिंदी’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसमूहांमध्ये देखील काम केले आहे. त्याच्या ट्विटर अकाउंटवर त्याने आपल्या प्रोफाईलच्या कव्हर फोटोच्या जागेवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘देव अस्तित्त्वात नाही’ असे लिहिले आहे. त्यामुळे तो नास्तिक असल्याचे जाणवत आहे. तो कट्टर डाव्या विचारसरणीचा असून त्याचा कर्मकांडवर विश्वास नाही.

योगी आदित्यनाथ यांचा केला अवमान

योगी आदित्यनाथ हे एक सन्यासी आहेत. उत्तर प्रदेशमधील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. याशिवाय शेकडो लोक त्यांना गुरु माणतात. एका महिलेने त्यांची कथित पत्नी असल्याचा दावा माध्यमांसमोर केला. तिच्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रशांतने आपले ट्विटर अकाउंटवर शेअर करुन योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. त्यामुळे गोरखपूर पोलिसांनी मानहाणीच्या कायद्याअंतर्गत प्रशांतला अटक केले.

- Advertisement -

पत्रकारांचा प्रशांतला पाठिंबा

दरम्यान द वायरचे सहसंपादक आणि द हिंदूचे माजी संपादक सिद्धार्थ वरदराजन यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणला जात असल्याचे म्हटले आहे. याशिवाय अनेक पत्रकारांनी प्रशांतच्या अटकेवर टीका केली आहे.

प्रशांतच्या ट्विटला संमिक्ष प्रतिक्रिया

प्रशांतने ट्विट केलेल्या व्हिडिओला लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी प्रशांत खोटी बातमी पसरवत असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी प्रशांतचे समर्थन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -