अंथरूणात बसून जेवणं, किचनमध्ये रिकामी भांडी, ‘या’ 5 चुकांमुळे व्हाल कंगाल

आम्ही तुम्हाला अशाच पाच मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे माणूस गरीब होऊ शकतो.

vastu shastra these 5 mistakes can make your poor and drown in debts

कधी कधी माणसाला त्याच्या छोट्याशा चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. यात वास्तूशी संबंधित चुकांमुळे अनेकदा कठीण प्रसंग उद्भवतात, असे ज्योतिषींकडून सांगितले जाते. यामुळे घरातील सुख-समृद्धी संपते, माणसं कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो आणि ज्याची परतफेड करणे अनेकदा अशक्य होते. अशा सर्व चुका वास्तुशास्त्रात सांगितल्या आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच पाच मोठ्या चुकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे माणूस गरीब होऊ शकतो.

1. काही लोक कचऱ्यासाठी वापरले जाणारे डस्टबिन घराबाहेर किंवा प्रवेशद्वारावर ठेवतात. वास्तू शास्त्रानुसार , असे केल्याने  लक्ष्मी नाराज होते, आणि हीच एक चूक श्रीमंत व्यक्तीलाही गरीब बनवू शकते. त्यामुळे घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच डस्टबिन घरापासून दूर ठेवायला विसरू नका.

2.काही लोकांना बेडवर आरामात बसून जेवायला आवडते. याबाबत वास्तुशास्त्रात कडक इशारा देण्यात आला आहे. ही एक चूक माणसाला  कंगाल करू शकते. यामुळे घराच्या सुख-समृद्धीलाही बाधा येते.

3. रात्री किचनमध्ये रिकामी भांडी ठेवणे देखील अशुभ मानले जाते. काही कारणास्तव तुम्ही रात्री उरलेली भांडी धुतली नसली तरी ती किचनमध्ये ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी किचन नीट स्वच्छ करा, नाहीतर घरात नेहमीच आर्थिक संकट राहील.

4. हिंदू धर्मात दानाचे मोठे महत्त्व सांगितले आहे. पण संध्याकाळी दूध, दही आणि मीठ दान केल्याने तुम्ही कंगाल होऊ शकता. वास्तू शास्त्रानुसार, संध्याकाळी या वस्तूंचे दान केल्यास घरात आर्थिक संकट येते. त्यामुळे सूर्यास्तानंतर या वस्तूंचे दान करण्याची चूक करू नका.

5. रात्री किचन किंवा बाथरूममध्ये पाण्याची भांडी रिकामी ठेवणे देखील अशुभ मानले जाते. बाथरूममध्ये नेहमी किमान एक बादली पाणी ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तर कमी होईलच, पण त्या व्यक्तीला कंगालही होऊ देणार नाही.


वट सावित्रीचे व्रत करताना ‘या’ गोष्टी टाळा