घरक्राइमसावधान! ऑनलाईन शॉपिंग करणे पडले महागात; २२ हजार ग्राहकांची केली फसवणूक

सावधान! ऑनलाईन शॉपिंग करणे पडले महागात; २२ हजार ग्राहकांची केली फसवणूक

Subscribe

ऑनलाईन शॉपिंगद्वारे लुटमार केली जात असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातील आरोपींच्या मागावर सायबर सेलचे पोलीस अधिकारी लक्ष देऊन आहेत. बँक, क्रेडिट-डेबिट कार्ड, विवाह नोंदणी संकेतस्थळे अशा विविध ठिकाणी लुटणार्‍या टोळ्या अधिक सक्रिय झाल्या आहेत. विविध पैशांची आणि नोकरीचे आमिष दाखवून लुटणार्‍या टोळ्यांचे अनेक फंडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अवलंबले जातात. त्यामुळे अशी गुन्हेगारी रोखताना पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यातच आता ऑनलाईन शॉपिंगद्वारे देखील लुटमार केली जात असल्याचे समोर आले आहे. नुकतेच एका ३२ वर्षीय तरुणाने ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या तब्बल २२ हजार महिलांची फसवणूक केली आहे.


हेही वाचा – पालघर गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात ८९ जणांना जामीन

- Advertisement -

७० लाख रुपयांचा गंडा

सध्याची अनेक तरुणपिढी मोठ्या संख्येने ऑनलाईन शॉपिंग करतात. मात्र, ऑनलाईन शॉपिंग करणे तब्बल २२ हजार महिलांना महागात पडले आहे. मुंबईत एका ३२ वर्षीय तरुणाने ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली ७० लाखांचा गंडा घातला आहे. आशिष अहिर (३२) असे आरोपीचे नाव असून त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनहून शिक्षण घेऊन भारतात परतला होता. वडिलांच्या कपड्यांच्या व्यवसायात झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने हा चुकीचा मार्ग निवडला आहे.

देशभरातील २२ हजार महिलांची फसवणूक

बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील २२ हजार महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधून एका आरोपीला अटक केली आहे.  – रश्मी करंदीकर; सायबर सेल डीसीपी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -