हिरोशिमा आणि नागासाकिचा ७६ वर्षांपूर्वीचा इतिहास; एका क्षणार्धात सगळचं नष्ट झालं

हिरोशिमा व नागासाकीवर ६ व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून दीड लाख जपानी नागरिकांना ठार मारले. मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहून या नरसंहाराची आठवण करत, दरवर्षी देशोदेशींचे लाखो लोक या दिवसाच स्मरण करतात.

१९४५ च्या सुमारात जग दुसऱ्या महायुध्दाच्या अंताकडे चालले होते. जवळपास सगळ्याच देशांनीच आपली शस्त्रे टाकली होती. मात्र त्याच वेळी अमेरिकेने जपानवर हल्ला केला. मुळात अमेरिकेचे हिरोशिमा व नागासाकी हे टार्गेत नव्हते. अमेरिकेनेला हा हल्ला जपानच्या औद्योगिक शहर असलेले कोकोवा या शहरावर हल्ला करण्या टार्गेट होता. पण वातावरणातील बदलामुळे तिथे हल्ला करण शक्य झाले नाही.

६ ऑगस्ट १९४५ रोजी एका अमेरिकन बी-२९ बॉम्बरने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. आणि ६ ऑगस्ट १९४५ रोजी एका अमेरिकन बी-२९ बॉम्बरने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. या हल्लामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली. जवळपास या हल्लात दीड लाख लोकांनी आपले प्राण गमावले. त्याच बरोबर येत्या पिढीच्या आरोग्याचा प्रश्न जपानसमोर उभा होता.

बॉम्बस्फोटमुळे संपूर्ण जपान हादरला होता. तरी सुध्दा जपानने शरणागती पत्करली नव्हती. ९ ऑगस्ट रोजी अमेरिकेने कोकुरा शहराच्या प्राथमिक लक्ष्यासाठी आणखी एक बी-२९ , बॉक्सकार पाठवले. कोकुरावर असलेल्या दाट ढगांमुळे पायलट मेजर चार्ल्स स्वीनी यांना बॉम्ब टाकण्यास अडथळा निर्माण झाला. म्हणून दुसरा निशाणा डोंगरांमध्ये वसलेल्या नागासाकीवर बसला. त्याने सकाळी ११.०२ वाजता ‘फॅट मॅन’ टाकला. हा प्लूटोनियम बॉम्ब हिरोशिमामध्ये वापरलेल्या बॉम्बपेक्षा अधिक शक्तिशाली होता. त्यातून २२ किलोटनचा स्फोट झाला.

आज कित्येक वर्षे लोटून गेली,पण त्या अणुबॉम्बचे पडसाद आजही तेथील नागरिकांमध्ये दिसतात. अणुबॉम्बच्या या विध्वंसक परिणामामुळे केवळ नागरिकच नाही तर शास्त्रज्ञही चिंताग्रस्त झाले. या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाइमर यांनी तर पश्चातापामुळे राजीनामा दिला. या दुर्दैवी घटनेला आज ७६ वर्षे पूर्ण होत आहेत.