घरताज्या घडामोडीमोठी बातमी! UPSC चा शेवटचा प्रयत्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी नाही

मोठी बातमी! UPSC चा शेवटचा प्रयत्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी नाही

Subscribe

UPSC ची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक संधी मिळण्याची आशा UPSC ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची होती. मात्र ही आशा मावळल्याचे दिसतंय. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील भूमिका मांडली आहे. या निर्णयामुळे UPSC चा शेवटचा प्रयत्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही.

केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायलयात भूमिका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर UPSC परीक्षेची आणखी एक संधी मिळावी, याकरता सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी यासंदर्भातील केंद्र सरकारच्या वतीने ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. यावेळी केंद्राला कोर्टाकडून असे सांगण्यात आले की, UPSC चा शेवटचा प्रयत्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नाही, तर याविषयी केंद्र सरकार कोणत्याही विचारात नाही. यामुळे कोर्टाने यासंदर्भातील एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यास देखील सांगितले. त्यानंतर सोमवारी कोर्ट या संदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी एक संधी मिळण्याची आशा UPSC ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची होती. विशेष म्हणजे ज्यांचा शेवटचा attempt होता. त्या उमेदवारांसाठी विशेष धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे UPSC चा शेवटचा प्रयत्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात येत आहे.

केंद्र सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की केंद्र सरकारचा अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यास नकार आहे. आता या प्रकरणावर अंतिम सुनावणी २५ जानेवारीला घेण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात युपीएससीची पूर्व परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी युपीएससीचा आपला शेवटचा प्रयत्न देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी वाढवून द्यावी अशा प्रकारची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारने यावर विचार करावा, असे निर्देश दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -