घरताज्या घडामोडीLive Update: दिल्लीतील एम्समधील कन्व्हर्जन्स ब्लॉक इमारतीच्या नवव्या मजल्यावर भीषण आग

Live Update: दिल्लीतील एम्समधील कन्व्हर्जन्स ब्लॉक इमारतीच्या नवव्या मजल्यावर भीषण आग

Subscribe

दिल्लीतील एम्समधील कन्व्हर्जन्स ब्लॉकमध्ये भीषण आग

नवी दिल्लीतील एम्समधील कन्व्हर्जन्स ब्लॉकमध्ये भीषण आग लागली आहे. इमारतीच्या नवव्या मजल्यावर आग लागली असून अद्याप कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीत वैद्यकी संसाधने, उपकरणे आणि प्रयोगशाळा आहे. आगीचे कारण अद्याप कळू अस्पष्ट असून अधिक नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्यात आज ९३५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर, ३८८ मृत्यू

राज्यात मृतांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी कोरोनाबाधितांचा आकडा मात्र काहीसा वाढलेला दिसला. मंगळवारी ९३५० कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. बुधवारी हा आकडा १०,१०७ इतका झाला. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५९ लाख ३४ हजार ८८० झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३६ हजार ६६१ इतकी झाली आहे.

- Advertisement -

सत्ता गेल्याने भाजपा सैरभैर झालंय, काय करावं कळत नाही, भाजपाला केवळ सरकारला बदनाम करायचे आहे, भाजपाची अवस्था जलबिन मछलीसारखी झाली आहे अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे.


कायदा हातात घेणं योग्य नाही- मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख


राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपा- शिवसेना आमनेसामने


भाजपाचे नेते माहिम पोलिस स्थानकात दाखल, मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे करा अशी भाजपाची मागणी,


भाजपच्या फटकार मोर्चामुळे दादर परिसरातील वाहतूक विस्कळीत


भाजपने प्रत्येक गोष्टीत स्टंटबाजी करण्याची गरज नाही – अरविंद सावंत


शिवसेना पोलिसांना पुढे करुन गुंडागिरी करतेय – प्रवीण दरेकर


शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा


शिवसेना भवनात भाजप सेना आमनेसामने


फटकार मोर्चातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले


तेजिंदरसिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा फटकार मोर्चा


राम मंदिर प्रकरणातील आरोपावर शिवसेना भवनासमोर भाजपचा फटकार मोर्चा


भाजपचा शिवसेना भवनासमोर ‘फटकार मोर्चा’


उद्या ओबीसीचा नाशिकमध्ये रास्ता रोको – छगन भुजबळ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंट लाईन वर्कर्ससाठी कस्टमाइज क्रॅश कोर्स लाँच केला आहे. आज सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉनफर्न्सिंगद्वारे हे लाँच करण्यात आले. २६ राज्यात १११ ट्रेनिंग सेंटर्स उभारण्यात येणार आहेत.


मुंबई मेट्रोचे काम ठप्प होण्याची शक्यता – आशिष शेलार


मुंबई मेट्रोसाठी जापानचा निधी सरकारने नाकारला – आशिष शेलार


वांगणी रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कर्जतकडे जाणारी लोकल तासभर रखडली. त्यामुळे इतर लोकल लूप लाईनवरुन रवाना करण्यात आल्या. त्यानंतर तासाभरानंतर लोकल कर्जतच्या दिशेने रवाना झाली.


आशा वर्कर्सच्या मागण्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – राजेश टोपे


आरक्षणासाठी घटना दुरुस्ती व्हावी – शाहू महाराज छत्रपती


हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या मूक आंदोलनस्थळी दाखल


श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या जम्मू आणि काश्मीर पोलिसांची शोध मोहिम सुरु आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्याचे  नाव उझैर अशरफ डार असून तो तो शोपियान येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून १ पिस्तूल,१ दारुगोळा मॅगझिन, 6 राउंड्स आणि २ ग्रेनेड जप्त केले आहेत.


 

आरक्षण देण्यास सरकार कमी पडले – प्रकाश आंबेडकर


संभाजीराजेंच्या नेतृत्वात मूक आंदोलनाला सुरुवात


राज्यभरातील मराठा समन्वयक मूक आंदोलनात सहभागी


कोल्हापूरात मूक आंदोलनाला सुरुवात


प्रकाश आंबेडकर आंदोलनस्थळी दाखल


खासदार संभाजीराजे आंदोलनस्थळी दाखल


भाजप नेते चंद्रकांत पाटील आंदोलनस्थळी दाखल


संभाजीराजे आंदोलनासाठी रवाना. कोल्हापूरात आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात


थोड्याच वेळात कोल्हापूरात मूक आंदोलनाला सुरुवात


देशात गेल्या २४ तासात ६२ हजार ३३४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून २ हजार ५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर देशात १ लाख ७ हजार ६२८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या ८ लाख ६५ हजार ४३२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.


पेण,अलिबाग तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तर रत्नागिरीत जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


पूर्व पश्चिम उपनगरात पावसाला सुरुवात


दापोली,मंडणगडमध्ये जोरदार पावसाला सुरुवात


मुंबईत सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील ४ दिवस मुंबई,ठाणे,पालघर,रायगड आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


संभाजीराजे छत्रपती आज कोल्हापूरात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मूक आंदोलन करणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर पुण्यातून निघाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -