Corona Virus Live Update: ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाच कोरोना, विभाग सील!

शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता मुंबईतल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ६ झाली आहे.


ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील एक महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह मिळून आल्यामुळे ठाणे मनपा आरोग्य विभाग सील करण्यात आले आहे.


कोल्हापूरमध्ये मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना घरी परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती मिळाल्यामुळे हे मजूर रस्त्यावर उतरले आहेत. काहींनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली आहे. महामार्गावरच्या तावडे हॉटेल परिसरात हे मंजूर गोळा झाले आहेत. सध्या पोलीस प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिरोली एमआयडीसी परिसरात हे हॉटेल आहे.


भारतीय रेल्वेने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने सांगितले आहे की, प्रवाशांकडून येत्या ३० जूनपर्यंत करण्यात आलेले तिकिटांचे सर्व बुकिंग भारतीय रेल्वेकडून रद्द करण्यात आले आहे. तसेच ३० जूनपर्यंत कोणतेही बुकिंग करता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचे सर्व पैसे परत केले जाणार आहेत. मात्र, या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे मात्र सुरू राहणार आहेत.

 


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दुसऱ्या टप्प्यातल्या आर्थिक घोषणा करण्यासाठई ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये देशातल्या शेतकरी वर्गासाठी घोषणा होण्याची शक्यता आहे.


गेल्या २४ तासांत भारतात ३ हजाह ७२२ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १३४ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे भारतातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ७८ हजारांच्या वर गेला आहे. आत्तापर्यंत २६ हजार २३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


कोरोना व्हायरस हा आपल्या आयुष्यात असणाऱ्या इतर विषाणूंसारखाच होऊन बसेल आणि तो कदाचित कधीच आपल्यातून जाणार नाही, असं काळजी वाढवणारं वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेचे आणीबाणी प्रमुख माईक रियान यांनी केलं आहे.


औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्या ७००च्या वर गेली आहे. काल रात्रीपासून औरंगाबादमध्ये ५५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ७४३ झाली आहे. तर १९ जणांचा मृत्यू झाला आहे.


कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने वकीलांचा ड्रेसकोड बदलला आहे. पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी, पांढरा नेक बँड अशा ड्रेसकोडची घोषणा करण्यात आली आहे. जोपर्यंत कोरोनाचं संकट आहे, तोपर्यंत होणाऱ्या व्हर्च्युअल कोर्ट रुममध्ये अशा वेशभूषेत कोर्ट कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


मध्य प्रदेशमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरचा अपघात झाल्यामुळे ८ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून किमान ५० मजूर जखमी झाले आहेत. गुना भागमध्ये हा अपघात झाला.


कोरोना लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर ट्रकमधून आपल्या गावी निघालेल्या मजुरांच्या एका कंटेनरचा काल रात्री ट्रकसोबत झालेल्या धडकेमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये किमान २ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बिहारच्या समस्तीपुरामध्ये हा अपघात झाला.