घरCORONA UPDATECoronavirus: कोरोना आणि व्हेरियंटविरोधी आता सक्षम औषध; जाणून घ्या औषध कसे काम...

Coronavirus: कोरोना आणि व्हेरियंटविरोधी आता सक्षम औषध; जाणून घ्या औषध कसे काम करते

Subscribe

हे औषध आफ्रिकेतील कोरोना वेरिएंट B१३५२ विरोधातही प्रभावी ठरले आहे

जगभरात कोरोना विरोधी औषधांवर संशोधन सुरु आहे. त्याचप्रमाणे जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरु आहे. त्यातच आता अमेरिकन संशोधकांनी एक औषध विकसित केले आहे जे केवळ कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासूनच नाही तर श्वसनमार्गावरुन होणाऱ्या संसर्गावर ही उपचार करते. उंदरांवर या औषधांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. पेन्स्लिवेनिया विश्वविद्यापिठाच्या शास्रज्ञांच्या नेतृत्वात हे औषध तयार करण्यात आले. हे औषध शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. उंदरांवर केलेल्या प्रयोगात असे सिद्ध झाले की, हे औषध शरीरात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ देत नाही. त्यामुळे वजनात फार कमी घट होते. या संशोधनात सामील झालेल्या प्रोफेसर सारा चेरी यांनी असे म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी फार कमी औषधे प्रभावी ठरली आहेत. औषधाच्या पहिल्या डोसमध्ये रोगप्रतिकारकशक्ती सक्रिय करणे ही कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी एक प्रभावी तंत्र ठरु शकते. (Coronavirus: capable drug against sars cov2 and variants)

हे औषध आफ्रिकेतील कोरोना वेरिएंट B१३५२ विरोधातही प्रभावी ठरले आहे. कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या या नवीन औषधाची माहिती सायन्स इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचे सतत नवीन रुप समोर येत आहे. कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी त्यावर प्रभावी अँटीव्हायरल औषध शोधणे आवश्यक आहे.

- Advertisement -

शास्रज्ञांनी पुढे असे म्हटले आहे की, आतापर्यंत मुले आणि प्रौढांना लस दिली आहे त्यांच्यासाठी लस सुरक्षित आहे. इन्फ्लूएन्झा,गोवर,गालगुंड,टिटनस आणि एचआयव्ही पासून बचाव करण्याच्या उद्देशाने जवळपास ३३८ शास्रज्ञांनी लसींचे विश्लेषण केले आहे. लसींमुळे मुलांमध्ये कोणताही धोका वाढत नाही.


हेही वाचा – India Corona Update: देशात ५० दिवसांत आज नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -