घरCORONA UPDATECorona Live Update: सीएच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

Corona Live Update: सीएच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

Subscribe

राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून, एका दिवसांत तब्बल छत्तीस जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) चार्टर्ड अकाउंटन्सी अर्थात सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा आणखी काही काळ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मे महिन्यात होणाऱ्या नियमित परीक्षा पुढे ढकलून त्या १९ जून ते ४ जुलैदरम्यान घेण्याचा निर्णय आयसीएआयने जाहीर केला होता. मात्र, लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ झाल्याने परीक्षाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान घेण्याचे आयसीएआयने जाहीर केले आहे. करोना विषाणूचा संसर्ग व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आयसीएआयच्या पश्चिम विभागीय समितीचे सदस्य यशवंत कासार यांनी दिली. परीक्षेची अधिक माहिती आयसीएआयच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.


चंद्रपुरात ‘कोरोना’ने शिरकाव केला आहे. चंद्रपुरात कोरोनाचा पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. एका ५० वर्षीय सुरक्षारक्षकाचा ‘कोरोना’ रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चंद्रपुर शहरातील कृष्णनगर भाग सील करण्यात आला आहे

- Advertisement -

येरवडा जेलमधून पाठवलेल्या ४ कैद्यांना कोरोनाची लागण

पुण्याच्या येरवडा कारागृहातून साताऱ्यातील कारारागृहात पाठवलेल्या ४ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या कैद्यांच्या संपर्कात येणाऱ्या १५ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्यामुळे साताऱ्यातील आकडा ७७ वर गेला आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

‘आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र गुजरातला हलवण्याला विरोध असून केंद्राचा निर्णय अत्यंत चुकीचा आणि नियोजनशून्य’, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ‘या निर्णयाने राजकीय तिढा निर्माण होईल, मुंबईतले केंद्र हलवणे देशाच्या अर्थकारणाला धोक्याचे ठरेल’, असा दावा देखील त्यांनी केला आहे.


एका रात्रीत आढळले ६८ नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यातच मुंबई आणि पुण्यात कोरोनाने विळखा अधिकच घट्ट केला आहे. पुणे जिल्ह्यात शनिवारी एका रात्रीत ६८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ९८० वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


मालेगावातील करोनाचा कहर; रुग्णांची संख्या ३२५

मालेगावात नव्याने २७ करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोना बाधितांची संख्या आता ३२५ झाली आहे. आज १२८ अहवाल प्राप्त झाले त्यात ९१ नकारात्मक आले असून ३७ अहवाल सकारात्मक आहेत. या सकारात्मक अहवालांमध्ये १० अहवाल हे जुन्या रुग्णांच्या दुसऱ्यांदा केलेल्या चाचणीचे असल्याची माहिती समोर आली आहे.


देशातील करोनाबाधितांची संख्या ४० हजारांकडे

भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या ३९ हजार ९८० झाली आहे. त्यापैकी १० हजार ६३३ जण ठिक झाले आहेत. सध्या २८ हजार ४६ करोनाबाधित रूग्ण आहेत. आतापर्यंत भारतात १ हजार ३०१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिला आहे.


देशभरातील कोरोना रुग्णालयांवर पुष्पवृष्टी


मुंबई-पुण्यातील रहिवाशांना गावी जाण्याची परवानगी नाही

राज्य सरकारच्या वतीने आता नवीन खुलासा करण्यात आला असून यामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये राहणार्‍या नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा इतर जिल्ह्यातून मुंबई-पुण्यामध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने काढलेल्या या नव्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरांमध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर ) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना आहेत. असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याची परवानगी आहे. (सविस्त वाचा)


करोनाग्रस्तांच्या आकड्यांची लपवाछपवी

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून आधीच महापालिका आणि शासनाच्या आकडेवारीत तफावत असतानाच आता महापालिकेने रुग्णांची संख्याच लपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मागील आठ दिवसांपासून महापालिकेने विभागनिहाय करोनाग्रस्तांची आकडेवारी प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक विभागांमध्ये करोनाग्रस्तांची नेमकी आकडेवारी समोर येत नाही. त्यामुळे सत्य बाहेर येईल या भीतीनेच करोना रुग्णांच्या आकड्यांचा खेळ करत एकप्रकारे महापालिका प्रशासन रुग्णांची लपवाछपवी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. (सविस्तर वाचा)


राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम असून, शनिवारी एका दिवसांत तब्बल छत्तीस जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा हा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील मृत्यूंची संख्या ५२१ झाली आहे. राज्यात शनिवारी ७९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तसेच आतापर्यंत २ हजार जण बरे होऊन घरी गेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -