घरताज्या घडामोडीबॉलिवूडमध्ये ड्रग्जचा धूर!

बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा धूर!

Subscribe

एनसीबी रडारवर ५०हून अधिक सेलिब्रिटी, दीपिका पदुकोणची शनिवारी होणार चौकशी,

बॉलिवूडमधील पसरलेला ड्रग्जचा धूर आता उजेडात येऊ लागला असून एनसीबीच्या (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) रडारवर ५० हून अधिक सेलिब्रिटी आहेत. या सर्वांची सखोल चौकशी केली जाणार आहे. यापैकी आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची शनिवारी चौकशी होणार आहे. धूर दिसत असल्याने बॉलिवूडमध्ये ड्रग्जची आग धुमसत असल्याचे एनसीबीला वाटत असून आता त्यादृष्टीने त्यांचा तपास सुरू झाला आहे. विशेष म्हणजे कोर्टाने गुरुवारी एनसीबीला थेट तुरुंगात जाऊन शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत या दोघांची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि दीपेश सावंत हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत.

सुशांत प्रकरणात एनसीबीने रिया चक्रवर्तीची चौकशी केली आणि या चौकशीदरम्यान सुशांत व ड्रग्जच्या कनेक्शनबरोबरच अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. ही नावे ऐकून अनेकांना धक्का बसलाय. एनसीबीच्या रडारवर कमीत कमी ५० हून अधिक सेलिब्रिटी असून यात अभिनेते आणि अभिनेत्रींबरोबर बडे निर्माते तसेच दिग्दर्शकांचा समावेश आहे. अमली पदार्थाबाबत तपास करीत असलेल्या एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोणसह श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि अन्य जणांना चौकशीसाठी समन्स पाठविला आहे. दीपिकाला शुक्रवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे.

- Advertisement -

एनसीबीच्या तपासादरम्यान DNSKअशी नावे समोर आली होती. आता एनसीबीचा त्या दिशेने तपास सुरू असताना डी म्हणजे बॉलिवूडची स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि K म्हणजे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश. दीपिकाचे करिश्मासोबत ड्रग्जसंबंधी चॅट समोर आले आहेत. त्यामुळे करिश्मा आणि दीपिका दोघांचीही चौकशी केली जाणार आहे.

ड्रग्ज प्रकरणात सारा अली खानचे नावही समोर आले असून सारा एका हाय प्रोफाइल ड्रग पेडलरच्या संपर्कात होती. ज्याचा एनसीबी शोध घेत आहे. सुशांतने सारासह केदारनाथ फिल्ममध्ये काम केले होते. रियाने आपल्या जबाबात सांगितले की, केदारनाथ चित्रपटादरम्यान सुशांत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत होता. त्यापूर्वीही तो ड्रग्ज घेत होता. मात्र, त्यानंतर त्याला ड्रग्जचे व्यसन लागले होते.

- Advertisement -

शौविक, दीपेशची तुरुंगात होणार चौकशी

नार्कोटिक्सच्या स्पेशल कोर्टासमोर गुरुवारी एनसीबीने सांगितले की, शौविकच्या मोबाइल फोनमधून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. शौविकचा या प्रकरणाशी थेट संबंध असल्याचे एनसीबीने कोर्टात दावा केला. शौविक हा बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शौविक याची सखोल चौकशी व्हायला हवी. त्याचबरोबर दीपेश सावंतची देखील दुसर्‍यांचा चौकशी करणे गरजेचे असल्याचे एनसीबीने कोर्टात सांगितले. विशेष न्यायाधीश जी.बी गुरव यांनी एनसीबीला तळोजा तुरुंगात जाऊन शौविक आणि दीपेशची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -