घरताज्या घडामोडीDhanteras 2021: धनोत्रयोदशीला करा धनाची देवता कुबेराची पूजा, जाणून घ्या शुभ...

Dhanteras 2021: धनोत्रयोदशीला करा धनाची देवता कुबेराची पूजा, जाणून घ्या शुभ मुहूर्त

Subscribe

या दिवशी भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनोत्रयोदशी. या दिवसाला दिवाळीच्या दिवसात विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवता असलेल्या कुबेराची पूजा केली जाते. सोमवारी वसुबारसेपासून दिवाळीचा सण सुरू होतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनोत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनाची देवता कुबेर त्याचबरोबर देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीचे आभार मानण्याचा हा आजचा दिवस असतो असे म्हटले जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर लक्ष्मी पूजन केले जाते. या दिवसाचे महत्त्व काय आहे? धनोत्रयोदशीची पूज आणि मुहूर्त काय आहे जाणून घ्या.

धनोत्रयोदशीचे महत्त्व

कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला भगवान धन्वंतरी कलश घेऊन समुद्र मंथनाच्या निमित्ताने प्रकट झाले होते म्हणून या दिवसाला धनोत्रयोदशी असे म्हटले जाते.  या दिवशी नवीन भांडी घेण्याची परंपरा आहे. धनोत्रयोदशीच्या मुहूर्तावर बाजारावर नवीन भांडी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी असते. या दिवशी भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

- Advertisement -

धनोत्रयोदशीचा शुभ मुहूर्त

२ नोव्हेंबर २०२१

प्रदोष काळ – संध्याकाळी ५:३७ ते ८:११ वाजेपर्यंत

- Advertisement -

वृषभ काळ – संध्याकाळी ६:१८ ते ८:१४ वाजेपर्यंत

धनोत्रयोदशीचा शुभ मुहूर्त – संध्याकाळी ६:१८ ते ८:११ वाजेपर्यंत

धनोत्रयोदशीची पूजा कशी करायची?

धनोत्रयोदशीची पूजा सूर्यास्तानंतर म्हणजेच संध्याकाळी केली जाते. घराच्या उत्तर बाजूला धन्वंतरी आणि भगवान कुबेराच्या मुर्तीची किंवा फोटोची स्थापन करा. त्यानंतर त्याची पूजा करा. कुबेराच्या पुढ्यात तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती, धूप,कापूराने आरती करा. पूजाच्या नैवेद्याला पिवळी मिठाई आणि पांढरी मिळावी आणावी. धन्वंतरी देवी आणि कुबेराला ही मिठाई फार प्रिय असल्याचे मानले जाते.

धनोत्रयोदशीला या मंत्राचे पठण करा

संध्याकाळी धनोत्रयोदशीची पूजा करताना ‘ओम ह्रिम कुबेराय नम: ||’ या जपाचे पठण करा.

ओम यक्षाय कुबेराय वैश्रवमाय धनधान्याधिपतयेधनधान्यसमृद्धीं मे देही दापय स्वाहा ||

ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नम: ||


हेही वाचा – Dhanteras 2021: सोनं खरेदी करताना करा असा भाव, बिल आवश्य पाहा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -