घरताज्या घडामोडीDeglur Assembly bypolls result: देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणी सुरू, कोण मारणार...

Deglur Assembly bypolls result: देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणुक मतमोजणी सुरू, कोण मारणार बाजी?

Subscribe

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देलगूरमध्ये शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या पोटनिवडणुकीला मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आजच्या मतमोजणीमध्ये कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. लोकसभेच्या ३ आणि सर्व राज्यांसह २९ विधानसभा जागांवर मतमोजणीची होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष देगलूर-बिलोली आणि दादरा नगर हवेलीच्या मतमोजणीकडे सर्वाधिक लागले आहे.

महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली येथे विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. भाजपकडून शिवसेनेतून आलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जितेश अंतापूरकर उमेदवार असले तरी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

- Advertisement -

देगलूर पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची ठरली आहे. भाजपकडून चांगली मोर्चेबांधणी आणि सभा मेळावे झाले आहे. तर त्याला महाविकास आघाडीकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दोन्ही पक्षांकडून कार्यकर्त्यांना ऑफर आणि सल्ले दिले गेले. देगलूरमध्ये एकूण ६.९५ टक्के मतदान झाले असून १ लाख ९० हजार ८०० लोकांनी मतदान केलं आहे.

काँग्रेस नेते आणि दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने ही जागा रिक्त होती. या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत असून काँग्रेसकडून त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : देशमुखांनी ईडीला पुरावे गोळा करण्यासाठी पुरेसा वेळ दिल्याने अटक, चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -