घरताज्या घडामोडीOLX Online shopping : OLX वर ऑनलाईन गाडी खरेदी पडली महागात; उरणच्या...

OLX Online shopping : OLX वर ऑनलाईन गाडी खरेदी पडली महागात; उरणच्या व्यक्तीला ५० हजाराचा गंडा

Subscribe

खरेदीच्या अॅपवर जाऊन कार शोधण्याचा प्रयत्न

ऑनलाईन शॉपींगमुळे खरेदी-विक्री करणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे हल्ली ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले आहे. मात्र ओएलएक्सवर ऑनलाईन गाडी खरेदी करणे उरणच्या एका व्यक्तीला महागात पडले आहे. त्याला ५० हजार रूपयाचा गंडा घातला आहे. सादाब नुर सोंडे या उरणमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला कार खरेदी करायची होती. त्यामुळे त्याने ओएलएक्स या ऑनलाईन वाहन खरेदीच्या अॅपवर जाऊन कार शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला घनवट डेव्हलपर्स या नावाने त्यांना तीन गाड्यांची जाहिरात दिसली. या तीन गाड्यांपैकी त्याने Toyota Fortuner ही गाडी निवडली.

गाडी खरेदीचा व्यवहार करण्यासाठी त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर या व्यक्तीने संपर्क साधला. गाडीचा खरेदी व्यवहार करण्यासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्याने त्या अनोळखी व्यक्तीशी चर्चा केली. या चर्चेत गाडीची किंमत १९ लाख अशी ठरविण्यात आली. त्यासाठी त्यांना ‘गणेश भोसले’ नामक व्यक्तीच्या खात्यात ५० हजार रूपये एडव्हान्स म्हणून भरले. त्यानंतर दोन दिवसांनी व्यवहार पूर्ण करणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही दोन दिवसांनी त्या व्यक्तीने पुन्हा सोंडे यांच्याकडे ३० हजार रूपयांची मागणी केली. त्यावेळेला सोंडे यांना या व्यवहाराबद्दल संशय आला. मग त्यांनी त्या व्यक्तीने दिलेल्या पुणे येथील पत्त्यावर जावून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे गेले असता, ती व्यक्ती त्या ठिकाणी राहत नसल्याचे समजले. त्यामुळे सोंडे यांना आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली. सोंडे यांनी याबाबत उरण पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. उरण पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – महिलेच्या अंर्तवस्त्रासोबत विकृत चाळे प्रकरणी NCB च्या अधिक्षकाला अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -