‘नो मास्क’ प्रकरणी राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

विना मास्क प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

mns raj thackeray on visit to pune today and yesterday
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, राज्यात कोरोना संसर्ग वाढत आहे तो राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे, असा धक्कादायक आरोप एका व्यक्तीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Adv. रत्नाकर चौरे, असे या तक्रारदाराचे नाव असून त्यांनी राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आणि राज ठाकरेंच मास्क प्रकरण चर्चेत आले

२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क येथे मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांना पत्रकरांनी तुम्ही मास्क का लावत नाही?, अशी विचारणा केली त्यावर ते म्हणाले की, ‘मी मास्क लावत नाही हे तुम्हालाही सांगतो’, त्यानंतर राज ठाकरेंच मास्क प्रकरण चांगलेच चर्चेत आले.

आणि महापौरांनी मास्क काढला

दरम्यान, ५ मार्च रोजी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिसरात एकच गर्दी केली होती. त्यावेळी देखील राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावला नव्हता. तसेच राज ठाकरेंचे स्वागत करण्यासाठी माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी तोंडाला दोन मास्क लावले होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’, असे विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केला.


हेही वाचा – कुजलेल्या अवस्थेत आढळला बेपत्ता व्यापार्‍याचा मृतदेह