घरमहाराष्ट्रकुख्यात गुंड गजा मारणेची येरवडा कारागृहात रवानगी

कुख्यात गुंड गजा मारणेची येरवडा कारागृहात रवानगी

Subscribe

सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणले.

पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जावळी तालुक्यातून आज मेढा पोलिसांनी ताब्यात बेड्या ठोकल्या आहेत. तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजा मारणे दुसऱ्या प्रकरणातून पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. परंतु मारणे काही दिवसांपासून महाबळेश्वर वाई परिसरात काही दिवसांपासून फिरत असल्याची माहिती मेढा पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला मेढा परिसरातून अटक केली. यानंतर मेढा पोलिसांनी गुंड गजानन मारणे याला येरवडा कारागृहात आज सकाळी आणण्यात आले. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सातारा पोलिसांकडून गजानन मारणेला ताब्यात घेऊन सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहात आणले.

गजानन मारणेच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला होता. हा कारवाईचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी २ मार्चला मंजूरी दिली होता. तेव्हापासून ग्रामीण पोलीस दलाची तीन पथके गजानन मारणे याच्या शोधात होते. याचदरम्यान मारणे गेल्या दोन दिवसांपासून सातारा(वाई), कोल्हापूर(मेढा) परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याचवेळी त्याला मेढा शहरातील जावळी भागातून ताब्यात घेण्यात आले. आज जावळी तालुक्यातील मिळणा परिसरात गजा मारणे आला असल्याची खबर पोलिसांना लागली आणि मेढा शहरात डस्टर गाडीतून फिरत असताना सापळा रचत सहाय्यक जेरबंद केले. त्याचबरोबर आणखी ३ साथीदार होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई साठी त्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

- Advertisement -

गुंड गजा मारणेने तळोजा जेलमधून सुटल्यानंतर तळोजा कारागृह ते पुणे शहरापर्यंत भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले होते. या शक्तीप्रदर्शनाचे अनेक व्हिडिओ माध्यमांसमोर आल्याने अनेकांनी यावर टीकेची झोड उठवली. या भव्य शक्तीप्रदर्शना दरम्यान विना टोल केलेला प्रवास, फूड मॉल येथे करण्यात आलेली दहशत याप्रकरणी मारणे विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आला. त्याच्या शेकडो साथीदारांवरही गुन्हा दाखल झाले. या रॅलीतील 36 जणांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 14 आलिशान मोटरी जप्त केल्या आहेत. त्यामुळे एखादा गुंड नियम धाब्यावर बसवत अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करत असल्याने पुणे पोलिसांच्या नावाचीही बदनामी झाली. कारण मारणेविरोधात याआधीही शेकडो गुन्हे दाखल आहेत. परंतु पुणे पोलीस खाते या रेकॉर्डवरच्या गुंडाला पकडू न शकल्याने पोलीस खात्याची अब्रु वेशीवर टांगली जात होती. या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस मारणेचा शोध घेत होते.मात्र मारणे याप्रकरणानंतर फरार झाला होता.


हेही वाचा- ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -