घरAssembly Battle 2022Manipur Election Phase 1 : मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण ! ...

Manipur Election Phase 1 : मणिपूरमध्ये मतदानाचा पहिला टप्पा पूर्ण ! संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७८.०३ टक्के मतदान

Subscribe

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. मणिपूरमध्ये पहिल्या टप्पात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७८.०३ टक्के मतदान पार पडले. मणिपूरमध्ये इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिशनपूर, चुराचंदपूर आणि कांगपोकपी जिल्ह्यात मतदान पार पडले. या जागांवर १५ महिलांसह १७३ उमेदवार उभे राहिले होते.

Manipur Election Phase 1 : मणिपूर विधानसभा निवडणूकीचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. पहिल्या टप्प्यात एकूण ३८ जागांवर मतदान पार पडले. या जागांवर एकूण १७३ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सकाळी ७ वाजता मणिपूरमध्ये मतदानाला सुरुवात झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. मणिपूरमध्ये पहिल्या टप्पात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ७८.०३ टक्के मतदान पार पडले. मणिपूरमध्ये इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिशनपूर, चुराचंदपूर आणि कांगपोकपी जिल्ह्यात मतदान पार पडले. या जागांवर १५ महिलांसह १७३ उमेदवार उभे राहिले होते.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर बाहेर येताच त्यांनी ३८ पैकी ३० जागांवर भाजपच जिंकेल असा दावा केला. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह. सिंगजामेईचे सभापती वाय खेमचंद सिंहग, उरीपोरते उपमुख्यमंत्री यमनाम जॉयकुमार सिंह आणि नंबोलमधून एन लोकेश सिंह हे प्रमुख उमेदवार लढतीसाठी उभे होते.

- Advertisement -

Manipur Election : मणिपूरमध्ये दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, मुख्यमंत्री बीरेन सिंह मैदानात

मणिपूरमध्ये पहिल्या टप्पात असलेल्या ३९ उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे मणिपूर मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यात १२ लाखांहून अधिक मतदान मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात ५.८० लाख पुरुष आहे तर ६.२८ लाख महिला मतदार आहेत. इतक्या मतदारांसाठी राज्यात १ हजार ७२१ मतदान केंद्र उभारण्यात आली होती. अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये सकाळी ७ ते दुपारी ५ वाजेपर्यंत पार पडली. कोरोनाबाधित आणि क्वारंटाइन असलेल्या मतदारांना मतदानासाठी दुपारी ३ ते ४ वाजताची वेळ देण्यात आली होती.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये सकाळी अकरा वाजेपर्यंत २७.३४ टक्के मतदान तर दुपारी एक वाजेपर्यंत ४८.८८ टक्के मतदान पार पडले. दुपारी तीन वाजेपर्यंत ६७.२२ टक्के मतदान झाले होते आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेवटच्या तासात ७८.०३ टक्के मतदान पार पडले.

मतदारसंघात दगडफेक आणि गोळीबार

मणिपूरमध्ये विधानसभा क्षेत्रात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. केराव विधानसभा मतदारसंघात दगडफेक आणि गोळीबाराच्या घटना समोर आल्या. त्याचप्रमाणे केईराओ विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्रांवर नागरिकांना पैसे वाटण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. नागरिकांना पैसे वाटणाऱ्या त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक देखील केली.

Manipur First Phase Voting : पहिल्या टप्प्यात ३८ पैकी ३० जागा आम्हीच जिंकणार, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

न्यू केइथलमानबी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे काही वेळासाठी मतदान ठप्प करण्यात आले होते. याचवेळी ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटचेही नुकसान झाले. रिटर्निंग ऑफिसरला तात्काळ बोलावून बॅकअप ईव्हीएम आणावे लागले.

 


हेही वाचा –  Assembly Election 2022: एन्डेमिक! रॅली रोड शो, प्रचारासाठी निवडणूक आयोगाकडून मर्यादा शिथिल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -