घरठाणेठाण्यात वनविभागाची कारवाई तात्पुरती स्थगित; वन कर्मचाऱ्यांचा फिरता पहारा  

ठाण्यात वनविभागाची कारवाई तात्पुरती स्थगित; वन कर्मचाऱ्यांचा फिरता पहारा  

Subscribe

जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढताना, कळवा घोलाईनगर येथे दोन घरांवर दरड पडली होती. यामध्ये एक रिकामे होते. दुसऱ्या घरात असलेले पाच जणांचा दुदैवी बळी गेला आणि दोन जण जखमी झाले. त्यानंतर वनविभागावर टीकेची झोड उठली होती.

घोलाईनगर येथील दरडीच्या घटनेनंतर वनविभागाने हाती घेतलेली कारवाई तूर्तास स्थगित केली आहे. ही कारवाई नागरिकांचा विरोध त्यातच पावसाळा असल्याने स्थलांतराला वेळ मिळावा यासाठी स्थगित केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. एकीकडे तोडू कारवाईत ७७ घरे जमीनदोस्त केली असून दुसरीकडे नव्याने पुनः घरे उभी जाऊ नये, आणि कोणी राहण्यास येऊ नये यासाठी वनविभागाने कर्मचाऱ्यांचा फिरता पाहरा तैनात केला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वनविभागाने एसआरपीला ही पाचारण केले असल्याची माहिती वनविभागाने दिली.

जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढताना, कळवा घोलाईनगर येथे दोन घरांवर दरड पडली होती. यामध्ये एक रिकामे होते. दुसऱ्या घरात असलेले पाच जणांचा दुदैवी बळी गेला आणि दोन जण जखमी झाले. त्यानंतर वनविभागावर टीकेची झोड उठली होती. त्यातून वनविभागाने सर्व्हेक्षण करून तेथील अनधिकृत झालेल्या १२०० घरांवर हातोडा टाकण्याचा निर्णय घेतला आणि कारवाईला सुरू केली. त्यानुसार ७७ घरे जमीनदोस्त करण्यात वनविभागाला यश आले. या कारवाईत सातत्य ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना, नागरिकांनी पुढे येत कारवाईला विरोध दर्शिवला. त्यातच पावसाळा असल्याने येथील नागरिकांना स्थलांतराला वेळ मिळावा यासाठी ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केली आहे. त्यातच तेथे नव्याने झोपड्या किंवा त्यामध्ये कोणी राहण्यास येणार नाही यासाठी त्या परिसरात कर्मचाऱ्यांचा फिरता पाहरा ठेवण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.

- Advertisement -

“या ठिकाणी चार वेळा कारवाई केली. त्यातच, पाचव्यांदा कारवाईसाठी जाताना जमावाने रेल्वे फाटक अडविल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. तसेच पाऊस असल्याने नागरिकांना स्थलांतर करण्यास वेळ लागत आहे. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कारवाईला स्थगिती दिली. मात्र त्या ठिकाणी नव्याने कोणी राहण्यास किंवा नवे घर उभे राहू नये यासाठी फिरता पाहरा तैनात केला आहे. एसआरपीच्या तुकडीला बोलविले आहे.”
– नरेंद्र मुठे, वनक्षेत्रपाल अधिकारी, ठाणे.


हेही वाचा – …त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी पहिली हिंदुत्वाची हाक दिली, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -