Ganesh Chaturthi 2022: कधी आहे माघी गणेश चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ

माघ महिन्यातील चतुर्थीला सकट चतुर्थी, तिळकूट चतुर्थी, तिळ चतुर्थी, वक्रतुंड चतुर्थी, माघी चतुर्थी अशा अनेक नावाने ओळखले जाते. त्यामुळे तुम्ही देखील माघी गणेशोत्सव साजरा करणार असाल तर यंदाच्या माघी गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे जाणून घ्या.

Ganesh Chaturthi 2022 maghi sakal chaturthi date shubh muhurat, puja rituals time of moonrise
Ganesh Chaturthi 2022: कधी आहे माघी गणेश चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि चंद्रोदयाची वेळ

हिंदू पंचांगानुसार, दर महिन्यात कृष्ण पक्षाला चतुर्थी तिथी असते. या दिवशी श्री गणेश चतुर्थीचे व्रत (Ganesh Chaturthi 2022)  केले जाते. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाला येणाऱ्या चतुर्थी तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व असून या दिवशी श्री गणेशाच्या मुर्तीची पूजा अर्चा केली होती. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करुन संध्याकाळी चंद्रयोयानंतर व्रताचे पारण केले जाते. यंदाची माघी गणेश चतुर्थी 21 जानेवारी,शुक्रवारी साजरी केली जाणार आहे.

माघ महिन्यातील चतुर्थीला सकट चतुर्थी, तिळकूट चतुर्थी, तिळ चतुर्थी, वक्रतुंड चतुर्थी, माघी चतुर्थी अशा अनेक नावाने ओळखले जाते. त्यामुळे तुम्ही देखील माघी गणेशोत्सव साजरा करणार असाल तर यंदाच्या माघी गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी काय आहे जाणून घ्या.

गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त

  • चतुर्थी तिथी प्रारंभ – 21 जानेवारी, सकाळी 8:54 वाजल्यापासून
  • चतुर्थी तिथी समाप्त – 22 जानेवारी, सकाळी 9:15 वाजेपर्यंत
  • चंद्रयोद – 21 जानेवारी, रात्री 8:44 मिनिटांनी

 

गणपतीला दाखवा तिळाचा नैवेद्य

माघी गणेश चतुर्थीला गणपतीला मोदकासोबतच तिळाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. व्रताचे पारण करताना तिळकूट किंवा तिळाच्या दाण्यांना फार महत्त्व आहे. असे म्हटले जाते की, भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीचे सर्व दुख: दूर होते त्याचप्रमाणे त्याच्या असंख्य मनोकामना देखील पूर्ण होतात. माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेणे म्हणजे श्री गणेशाचे दर्शन घेतल्याचे पुण्य लाभते.

गणेश चतुर्थी पूजा विधी

या दिवसी ब्राम्ह मुहूर्तावार उठून पहिल्यांदा स्नान करा. त्यानंतर गणेशाचे नामस्मरण करत पिवळ्या रंगाच्या कापडावर श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर गंगाजल घेऊन संपूर्ण घरात शिंपडून घर पवित्र करुन घ्या. गणेशाच्या मुर्तीला फुलाने पाणी अर्पण करा. त्यानंतर गणेशाला लाल रंगाचे फूल, सुपारी, लवंग, वेलची, चवळी अर्पण करावी. त्यानंतर गणेशाला नारळ आणि उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. तसेच गणेशाच्या मुर्तीजवळ दक्षिणा आणि 21 लाडू अर्पण करुन धूप, दिवा आणि अगरबत्तीने पूजा करावी.

या मंत्राचा जप करावा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

सकाळी गणेशाची पूजा झाल्यानंतर संध्याकाळी चंद्रयोदय झाल्यानंतर गणेशाची पूजा करावी. संकष्टी व्रताची कथा वाचावी किंवा पाठ करावी. पूजा समाप्तीच्या वेळी सर्वांना प्रसाद वाटावा. त्यानंतर रात्री चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडावा अशा प्रकारे तुमचे माघी संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होईल.


हेही वाचा – Magh Month 2022: माघ महिन्यात का केले जाते गंगा स्नान? काय आहे महत्त्व आणि पौराणिक कथा?