घरताज्या घडामोडी26/11 च्या शहीद पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयात अभिवादन संचलन

26/11 च्या शहीद पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयात अभिवादन संचलन

Subscribe

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची कार्यक्रमाला उपस्थिती

26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी बारा वर्षे पूर्ण होत असून या हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना अभिवादन संचलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी हा कार्यक्रम मरिन ड्राईव्ह येथील पोलीस जिमखाना येथे आयोजित केला जातो. मात्र, यंदा हा कार्यक्रम पोलीस आयुक्त कार्यालयात होणार आहे. 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कोस्टल रोडचे काम सुरु असल्याने पहिल्यांदा पोलीस जिमखाना येथे हा कार्यक्रम न होता पोलीस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.

- Advertisement -

यावेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहीद पोलीस अधिकारी आणि जवानांचे कुटुंबिय उपस्थित राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखावयाचे असल्याने या कार्यक्रमाला ठराविक निमंत्रितांना उपस्थित राहण्याविषयी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे अभिवादन संचलन कार्यक्रमाला सर्वांना विहित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -