घरठाणेकल्पिता पिंपळे यांच्या बोटांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली यशस्वी; सात तास सुरू होती...

कल्पिता पिंपळे यांच्या बोटांची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ठरली यशस्वी; सात तास सुरू होती शस्त्रक्रिया

Subscribe

कासारवडवली येथे फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला होता.

कल्पिता पिंपळे यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्या शस्त्रक्रियेला तब्बल सात तास सुरू होती. पिंपळे यांचा वैद्यकीय खर्च ठाणे महानगरपालिका करणार असल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. कासारवडवली येथे फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला होता. यात त्यांची दोन तर त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर त्याना तातडीने आधी घोडबंदर रोड येथील आणि त्यानंतर माजीवडा येथील रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. सोमवारी रात्री तब्बल सात तास त्यांच्या बोटाचे पुनःप्रत्यार्पण करण्याची अवघड शस्त्रक्रिया पार पडली.

आज सकाळी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर बोलताना त्यांनी मनपा अधिकार्‍यांवर अशाप्रकारे केलेला हल्ला खपवून घेतला जाणार नसून या प्रकरणातील आरोपी फेरीवाल्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं. शहरातील अनधिकृत फेरीवाल्याविरोधातली कारवाई यापूढेही सुरूच ठेवणार असल्याच सांगितलं. शहरातील फेरीवाल्यांना त्याना आखून दिलेल्या ’हॉकर्स झोन’ मध्ये व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र त्याव्यतिरिक्त पदपथ अडवून धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

शहरातील स्थानिक फेरीवाले अशा गोष्टी कधीही करत नाहीत मात्र शहराबाहेरून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्याकडून हे कृत्य घडले असल्याची शक्यता लक्षात घेता असे फेरीवाले शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याच शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. यावेळी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर हेही उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -