घरताज्या घडामोडीLive Update: माथेरानच्या मिनीट्रेनची सेवा उद्यापासून सुरू

Live Update: माथेरानच्या मिनीट्रेनची सेवा उद्यापासून सुरू

Subscribe

मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०१४ मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील समित्यांमध्ये नगरसेवक, पदाधिकारी यांनाही स्थान देण्यात येईल. याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मंत्री सुभाष देसाई, अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, प्रधान सल्लागार अजोय मेहता, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते


पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेन उद्यापासून धावणार आहे. अमन लॉज ते माथेरान अशा दररोज चार फेर्‍या धावणार असून पर्यटकांना यांच्या मोठा फायदा होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात मिनीट्रेन गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर पावसाळ्यात ही मिनीट्रेन बंद होती. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

मुंबईच्या चारकोप भागात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चिमुकल्या मुलीचं अपहरण करुन १५ हजार रुपयांमध्ये या मुलीची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विक्री करणाऱ्या पती-पत्नीसह खरेदी करणाऱ्या दाम्पत्याला देखील मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी अवघ्या ४ तासात या घटनेचा तपास लावला आहे.


अभिनेता विजय राजला गोंदियातून अटक करण्यात आली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्टाफमधल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे ३० वर्षीय तरुणीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजय राजला अटक करण्यात आली आहे

- Advertisement -

देशात २ नोव्हेंबर ११ कोटी १७ लाख ८९ हजार ३५० नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात १० लाख ४६ हजार १४७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ३१० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८२ लाख ६७ हजार ६२३वर पोहोचला आहे. तसेच २४ तासांत ४९० जणांचा मृत्यू झाला असून ५८ हजार ३२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना मृतांचा आकडा १ लाख २३ हजार ९७वर पोहोचला असून आतापर्यंत ७६ लाख ३ हजार १२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या देशात ५ लाख ४१ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


बिहारमध्ये आज दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. १७ जिल्ह्यांत ९४ जागांसाठी बिहार विधानसभा निवडणूक लढली जात आहे.


आज अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक लढली जाणार आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसच्या बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


जगात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्याप्रमाणे कोरोना रुग्ण रिकव्हरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ कोटी ७३ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत १२ लाख ११ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसचे ३ कोटी ४० लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहे.


राज्यात ४,००९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,८७,७८४ झाली आहे. राज्यात १,१८,७७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज १०४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४४,१२८ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ टक्के एवढा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -