Monday, May 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Live Update: दिल्लीत २४ तासांत २४,१४९ रुग्णवाढ, ३८१ जणांचा मृत्यू

Live Update: दिल्लीत २४ तासांत २४,१४९ रुग्णवाढ, ३८१ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

दिल्लीत गेल्या २४ तासांत २४ हजार १४९ रुग्णांची नोंद झाली असून ३८१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १७ हजार ८६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिल्लीतील आता कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ७२ हजार ६५वर पोहोचली आहे.


- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजार ३५८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ८९५ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४४ लाख १० हजार ८५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ६७ हजार १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 


- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासांत ४ हजार १४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ३५ हजार ५४१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १२ हजार ९१२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ लाख ५५ हजार १०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


पुढील चार दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.पुढील चार दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूर्वमोसमी पावसाचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणासह राज्यातील सर्वच भागांत आजपासून पाच दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीटी आणि हलक्या पावसाचा सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ( सविस्तर वाचा )


राज्यात १ मे पर्यत कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी असे संकेत दिले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या घटत असली तरी राज्यातील रुग्णसंख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यावर निर्णय होणार असल्याचे विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले आहे. (सविस्तर वाचा )


देशात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मंगळवारी हीच कोरोना रुग्णसंख्या ३ लाख ५२ हजार ९९१ इतकी होती तर मृतांचा आकडा २८१२ वर पोहचला होता, मात्र आज रुग्णसंख्येत २९ हजारांपर्यंत घट झाल्याची आकडेवारी जाहीर झाली.


 

काल मुंबईत तब्बल ६९ हजार५६६ मुंबईकरांनी कोरोना लस घेतली. मुंबईत आतापर्यंत करण्यात आलेल्या लसीकरणात हे सर्वात जास्त लसीकरण काल करण्यात आले.


देशातील कोरोना परिस्थितीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक सुमोटो याचिका दाखल केली होती. कोरोा व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारला एक नोटीसही जारी करण्यात आली होती.


फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई सायबर पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला यांना २८ एप्रिल रोजी मुंबई सायबर पोलिस स्टेशममध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. ( सविस्तर वाचा ) 


अंडरवर्ल्ड छोटा राजनला कोरोनाची लागणी झाली असून त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिहार जेलच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती सोमवारी सत्र न्यायालयाला दिली.

- Advertisement -