घरताज्या घडामोडीmodi security breach: रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदी नौटंकी करत परतले, नाना पटोलेंचा घणाघात

modi security breach: रिकाम्या खुर्च्यांमुळे मोदी नौटंकी करत परतले, नाना पटोलेंचा घणाघात

Subscribe

सभेतील खुर्च्या खाली असल्यामुळे पळ काढणारे मोदी आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी यांच्यात खुप तफावत आहे. ज्या अमेरिकेला, चीनला देशाच्या सुरक्षेसाठी कुठेही समझोता न करणाऱ्या इंदिरा गांधी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये सुरक्षेत हलगर्जीपणा झाला होता. या हलगर्जीपणाचे पडसाद आता देशात उमटत आहेत. पंजाब सरकारने दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु सभेतील खुर्च्या खाली असल्यामुळे मोदींनी तिथून पळ काढला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौटंकी करत पळ काढला असल्याचा घणाघात मोदींनी केला आहे. तसेच मोदी नौटंकी करुन देश चालवत असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. नाना पटोले म्हणाले की, आता देशाला माहिती आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण गेल्या ७ वर्षामध्ये नौटंकी करुन देश चालवत आहेत. नौटंकी शब्द हा त्यांना बरोबर बसतो आहे. देशाचे पंतप्रदान मोदी यांनी जेव्हा नोटबंदी केली आणि नंतर गोव्यात जाऊन सांगितले की, ५० दिवसांत नोटबंदी यशस्वी झाली नाही तर ज्या चौकात मला शिक्षा द्याल तिथे भोगायला तयार आहे. नोटबंदी यशस्वी झाली का? याचे उत्तर मोदींनी द्यावे असे नाना पटोले म्हणाले आहेत.

- Advertisement -

कधी रडणं, कधी पायाला लागणे ही नौटंकी

जीएसटी टॅक्स आणून देशातील सामान्य लोकांना बरबाद कऱण्याची व्यवस्था या सरकारच्या काळात आणली आहे. कधी रडणं आणि कधी पायाला लागणे हे सगळं पंतप्रधान नौटंकी करत आहेत. नौटंकी करणाऱ्या व्यक्तीला नौटंकी म्हणायचे नाही का? पंजाबमध्ये ज्या पद्धतीने खुर्च्या खाली बघायच्या आणि तिथून पळ काढायचा मग त्याच्यासाठी नौटंकी करायची ही भूमिका पाहायला मिळाली असून तेच वास्तव आहे असे नाना पटोले म्हणाले आहेत.

पंतप्रधानांनी प्रोटोकॉल तोडला

पंजाबचे सरकार बरखास्त करायचे असा त्यांचा कट आहे. पंजाबमध्ये भाजपची जी अवस्था झाली आहे ती अवस्था दुरुस्त कसं करता येईल हा त्याचा प्रयत्न होता. यासाठी हा नौटंकी केली होती. एसपीजीने जो मार्ग ठरवला होता. ज्या हेलिकॉप्टरने ते जाणार होते त्या हेलिकॉप्टरने न जाता रस्ते मार्गाने जाण्याची भूमिका घेण्यात आली. खर तर पंतप्रधानांनी मार्ग निवडला होता. पंतप्रधानांना प्रोटोकॉल तोडण्याचे अधिकार नसतात जर पंतप्रधानांनी प्रोटोकॉल तोडून दुसऱ्या मार्गाने जाण्याचे ठरवले कारण सभेत खुर्च्या खाली होत्या. शेतकऱ्यांनी त्यांनी ठेंगा दाखवला आहे. त्यामुळे ही नौटंकी केली आहे. अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

- Advertisement -

मोदींची इदिरा गांधींशी तुलना होऊ शकत नाही

ज्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्याची तुलना मोदींशी करण्यात येत असेल तर त्याची तुलना होणार नाही. सभेतील खुर्च्या खाली असल्यामुळे पळ काढणारे मोदी आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करणाऱ्या इंदिरा गांधी यांच्यात खुप तफावत आहे. ज्या अमेरिकेला, चीनला देशाच्या सुरक्षेसाठी कुठेही समझोता न करणाऱ्या इंदिरा गांधी आहेत. आज नरेंद्र मोदी चीनचा च शब्द काढायला पण घाबरतात असे नाना पटोले म्हणाले.


हेही वाचा : PM मोदींच्या सुरक्षेतील चुकीचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, CM चन्नींकडूनही चौकशी समिती गठीत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -