घरताज्या घडामोडीMumbai Pune Highway : सुकलेल्या झाडांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताची शक्यता

Mumbai Pune Highway : सुकलेल्या झाडांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर अपघाताची शक्यता

Subscribe

जोरदार वार्‍यामुळे झाडे सहजपणे कोसळू शकतात.

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुकलेल्या आणि आजूबाजूला माती उत्खनन केलेल्या झाडांचे कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याचे भय असून, यात अनर्थ उद्भविण्याची शक्यताही नाकारली जात नाही.अहोरात्र वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील दोन्ही बाजूस दांड फाटा ते खालापूर दरम्यान अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत असून, काही झाडांच्या बुंध्याजवळची माती काढल्यामुळे, तसेच पावसाने जमिनीची धूप झाल्याने हीसुद्धा झाडे धोकादायक ठरू शकतात. या मार्गावरून जाणारी दुचाकी, रिक्षा, अथवा चारचाकी वाहनावर सुकलेले झाड किंवा त्याची मोठी फांदी पडल्यास जीविताला धोका ठरू शकणार आहे. ही उभी असलेली झाडे ऑस्ट्रेलियन आकेशी, गुलमोहर जातीची आहेत, जी सुकण्यास वेळ लागत नाही. जोरदार वार्‍यामुळे ती सहजपणे कोसळतात.

खोपोली मार्गावर वावंढळ-चौक दरम्यान रामानंद सागर फार्महाऊस जवळ असलेली झाडे फारच धोकादायक आहेत. तेथे असणारी सावर पूर्णपणे सुकलेली आहे. तर याच ठिकाणी चढणीवर काही झाडे जमिनीची धूप झाल्याने वाकलेल्या अवस्थेत उभी आहेत. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ही या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करीत आहे. त्यांनी वेळीच लक्ष देऊन ही धोकादायक झाडे वन खात्याची परवानगी घेऊन काढून टाकण्याची मागणी अपघातग्रस्तांना मदत करणारे रामदास काईनकर आणि भिलवलेचे पोलीस पाटील अनंत ठोंबरे यांनी केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Drug Case : फडणवीसांच्या इशाऱ्यावरच राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू, नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -