घरक्राइमNCB च्या अधिकाऱ्यांवर ड्रग्स तस्करांच्या टोळीचा हल्ला

NCB च्या अधिकाऱ्यांवर ड्रग्स तस्करांच्या टोळीचा हल्ला

Subscribe

पाच अधिकारी जखमी तर १ गंभीर

ड्रग्स तस्करावर कारवाईसाठी गेलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिकाऱ्यावर ड्रग्स तस्करी करणाऱ्या नायजेरियन टोळीने धारदार शस्त्रे आणि दगडाने हल्ला केल्याची खबळजनक घटना गुरुवारी रात्री मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळील तिवरांच्या जंगलात घडली आहे. या हल्ल्यात ५ अधिकारी जखमी झाले असून त्यापैकी एक अधिकारी गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान एनसीबीने या टोळीतील एका नायजेरियनला अटक केली असून इतर नायजेरियन तस्करांनी काळोखाचा फायदा घेऊन पळून गेले असल्याची माहिती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या नायजेरियनकडून एनसीबीने २५४ग्राम हेरॉईन,५२ ग्राम एमडी आणि ७.५ ग्राम कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. एनसीबीवर ड्रग्स तस्कराकडून हल्ला करण्याची हि चौथी घटना आहे. (NCB officers attacked by drug peddler gang at thane)

मानखुर्द रेल्वे स्थानका पासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रुळजवळ असलेल्या तिवरांच्या जंगलात ड्रग्स तस्करी करणारी ४ ते ५ जणांची नायजेरियन टोळी कार्यरत असून हि टोळी मुंबई तसेच मुंबई जवळील शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स पुरवठा करीत असल्याची  माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री एनसीबीच्या अधिकारी यांनी सापळा रचून तिवरांच्या जंगलात दलदलीत काळोखात उभा असलेल्या एका नायजेरियन एनसीबीच्या अधिकारी यांनी हटकले असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला.

- Advertisement -

त्यावेळी आरडाओरड करताच इतर त्याचे इतर सहकारी धावत आले. एनसीबीच्या अधिकारी यांना बघून या टोळीने पळून जाण्याचा पर्यत करीत असताना अधिकारी यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता या टोळीने एनसीबीच्या अधिकारी यांच्यावर चाकू, धारदार शस्त्रे आणि  दगडाने हल्ला करण्यास सुरुवात केली. दरम्यान एनसीबीच्या अधिकारी यांनी हा हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला केला असता त्यात ५ अधिकारी जखमी झाले.

नायजेरियन ड्रग्स तस्करांनी याचा फायदा घेत काळोखातून तेथून पोबारा केला, मात्र या टोळीतील एकाला पकडण्यात एनसीबीला यश आले आहे. ओबियोराह एकवेलार, एस/ओ एकवेलार असे ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन ड्रग्स तस्कराचे नाव आहे. त्याच्याजवळून एनसीबीने २५४ग्राम हेरॉईन,५२ ग्राम एमडी आणि ७.५ ग्राम कोकेन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. ड्रग्स तस्करांनी केलेल्या हल्ल्यात पाच अधिकारी जखमी झाले असून त्यापैकी एका धिकारी याला गंभीर इजा झाली असल्याची माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली. इतर चार अधिकारी यांच्यावर ज.जे. रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या अधिकरी याच्यावर सैफी रुग्णलयात उपचार सुरु असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. पळून गेलेल्या तस्करांकडे चाकू, सुरे पिस्तूल हे हत्यार होते मात्र त्यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांनी गोळीबार केला नसल्यची माहिती एनसीबीच्या अधिकारी यांनी सांगितले.

- Advertisement -

 


हे ही वाचा – डिसेंबर पर्यंत लशी उपलब्ध होतील असे सांगणारे राजकारणी थापाडे – सायरस पूनावाला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -